गावगाथा

*नियोजन व कर्तव्यतत्परता हेच यशस्वीतेचे मूलमंत्र — मा.रविकांत पाटील*

सत्कार

*नियोजन व कर्तव्यतत्परता हेच यशस्वीतेचे मूलमंत्र —
मा.रविकांत पाटील*

चपळगाव, दि.

विध्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन करून,कर्तव्याला प्राधान्य दिले तर जीवनातील ध्येय साध्य करणे शक्य आहे असे मत मा. रविकांत पाटील यांनी व्यक्त केले.
MRN ग्रुप शुगर फॅक्टरी व डिस्टीलरी प्रकल्पास SISSTA,बेंगलोर (कर्नाटक)कडून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मॅनेजिंग डायरेक्टर मा. रविकांत पाटील साहेब यांचे ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयकडून सत्कार करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्था संचालक श्री.गुलाब बानेगाव, सोसायटीचे माजी चेअरमन नंदकुमार पाटील,धानप्पा पाटील,प्राचार्य माने सर,पर्यवेक्षक बानेगाव सर,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,CEO नीलकंठ पाटील सर,पवार सर,वाघमोडे सर,जवळगी सर,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मठपती सर,कदम सर,भोसले सर,नरे सर,उटगे सर आदी गुरुजन वर्ग उपस्थित होते.
यावेळी स्व.प्रा.अप्पासाहेब खुबा प्रतिष्ठान,काझीकणबस कडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.नीलकंठ पाटील सर यांचे आणि कै.श्री. माणिकराव पाटील शिक्षण प्रतिष्ठान,कोल्हापूर कडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.रमेश मठपती सरांचे संस्था आणि प्रशालेकडून सत्कार करण्यात आले.
पुढे बोलताना मा. रविकांत पाटील साहेब म्हणाले, पुरस्कार हे प्रेरणादायी असतात.गुणवत्तापूर्ण विध्यार्थी घडवण्यासाठी संस्था कटीबद्ध आहे.
नीलकंठ पाटील सरांनी आपल्या मनोगतात म्हणाले, स्व. पी.वाय.पाटील सरांच्या शैक्षणिक विचारांतून वाटचाल करत आहे.आजचे पुरस्कार हे फलित आहे.
श्री. मठपती सरांनी आपल्या मनोगतात सांगितले, या संस्थेकडून सत्कार होणे म्हणजे मोठे भाग्य आहे.संस्थेने दिलेले सत्काररुपी पाठबळ बहुमोल आहे.
यावेळी सर्व गुरुजन वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजापूरे सरांनी केले.
आभार प्राचार्य माने सरांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button