गावगाथा

कै.सौ.रुपालीताई इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त समाजसेवक सुनील कटारे परिवाराच्यावतीने साडया वाटप.

साड्या वाटप करताना सुनील कटारे, शिवशरण अचलेर, वृक्षारोपण करताना अंकुश केत, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, काका सुतार व अन्य दिसत आहेत.

कै.सौ.रुपालीताई इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त समाजसेवक
सुनील कटारे परिवाराच्यावतीने साडया वाटप.

HTML img Tag Simply Easy Learning    

(अ.कोट.दि.३१/५/२५.)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.रुपालीताई इंगळे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. प्रथम पुण्यस्मरणाचे विधीवत कार्य पार पडल्यानंतर आप्तेष्टासह सर्वाना भोजन देण्यात आले. येथील व्यापारी व महेश इंगळे मित्र परिवारचे सदस्य अंकूश केत यांच्या वतीने वागदरी रोडवरील इंगळे फार्म हाऊसलगत विविध फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर अक्कलकोट सोलापूर जिल्हा शिवसेनेचे
मा.जिल्हा उपप्रमुख, थोर समाजसेवक सुनील कटारे परिवार यांच्या वतीने कै.रूपालीताई इंगळे यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त शहरातील गरजू व गरीब महिलांना मातोश्री सुशिलाबाई अप्पाराव कटारे यांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आले. चंद्रकांत सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली फत्तेसिंह चौक मित्र मंडळीच्या वतीने कै.रूपालीताई इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी प्राध्यापक शिवशरण अचलेर सर, सुनील कटारे, मा.नगरसेवक शिवपुत्र हळगोदे, उद्योगपती अंकुश केत, श्रीशैल गवंडी, काका सुतार, मधुकर सदाफुले, कामगार सेना अध्यक्ष स्वामीनाथ हेगडे, मनोज इंगुले, प्रसाद पाटील सर, अशोक कलशेट्टी, श्रीकांत झिपरे, पाटील सर, व महेश इंगळे मित्र परिवारातील अन्य सदस्यांनी सर्व उपक्रम राबविण्याकरिता यशस्वीरित्या परिश्रम घेतले.

 

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – साड्या वाटप करताना सुनील कटारे, शिवशरण अचलेर, वृक्षारोपण करताना अंकुश केत, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, काका सुतार व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button