श्री.वटवृक्ष मंदीर समितीचे कार्य गौरवास्पद –
क्षिप्रा मानकर
(अ.कोट, दि.०४/०६/२०२५)
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक कार्य गौरवास्पद असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्याचे सुप्रसिद्ध निवेदिका व्याख्याता तथा समुपदेशक क्षिप्रा मानकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी क्षिप्रा मानकर यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी क्षिप्रा मानकर बोलत होते. पुढे बोलताना क्षिप्रा मानकर यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दत्त सांप्रदाय मधील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ आहे. देवस्थानमुळे अक्कलकोट शहराचा येणाऱ्या काळात कायापालट होईल. स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन असलेली ही नगरी आहे. अशा धार्मिक ठिकाणी सेवा करणे हे इथल्या सेवेकऱ्यांचे परमभाग्य आहे. देवस्थान समितीने ही वृत्ती जोपासून देवस्थानचा आध्यात्मिक वारसा पुढे चालविला आहे, म्हणून श्री वटवृक्ष मंदिर समितीचे कार्य गौरवास्पद असल्याचे मनोगतही यांनी व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे प्रमुख युवा कार्यकारी नेतृत्व प्रथमेश इंगळे, नन्नू कोरबू, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, दर्शन घाटगे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – क्षिप्रा मानकर यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत
Back to top button
×
No WhatsApp Number Found!