ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड
दिन विशेष

ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड
चपळगाव, दि. ५ जून

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव यांच्या वतीने आज परिसरात विविध प्रकारच्या पारंपरिक व मौल्यवान वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांसह संपूर्ण शिक्षकेतर व शिक्षकवर्गाने सक्रिय सहभाग नोंदवला.

या उपक्रमामागील प्रमुख संकल्पना संस्थाध्यक्ष श्री. रविकांत पाटील यांची असून, प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला आहे. वृक्ष लागवड उपक्रम ही केवळ एक दिवसीय घटना न राहता, ती दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून राबवली जावी, असे संस्थेचे धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमावेळी प्राचार्य श्री. संजय माने, पर्यवेक्षक श्री. विश्वनाथ बानेगाव, CEO नीलकंठ पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. ज्ञानेश्वर कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. राजशेखर विजापुरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. संतोष नरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. मोहन दुलंगे, श्री. रविकांत थवंटे, श्री. अशोक कांबळे, श्री. राजू मोची, श्री. इर्शाद पटेल, श्री. बारीक मामा गजधाने, श्री. जितेंद्र दुलंगे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण विद्यालय परिवाराचे व पर्यावरणप्रेमी शिक्षकवर्गाचे परिसरातून कौतुक होत आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हीच अपेक्षा आहे.
