श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने सन्मान ..
विक्रमशीला हिंन्दी विद्यापीठ-भागलपूर, बिहार सारस्वत सन्मान वर्ष-२०२२
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221211-WA0018.jpg)
- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना विक्रमशीला हिंन्दी विद्यापीठ-भागलपूर, बिहार सारस्वत सन्मान वर्ष-२०२२ चा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभाग सभागृहात केंद्रीय शाखा महाराष्ट्र राज्य आयोजित विशेष सारस्वत सन्मान वर्ष-२०२२ चा ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारख फूड प्रोडक्ट्सचे अध्यक्ष प्रकाश पारख, विक्रमशीला हिंन्दी विद्यापीठ-भागलपूर, बिहारचे कुलपती डॉ.संभाजीराव बाविसकर, उप कुलपती डॉ.शिवलाल जाधव, प्रति कुलपती डॉ.राजअल्वीन देवदास हे होते. अमोलराजे भोसले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी संतोष चनशेट्टी, सिद्धेश्वर जाधव, राहुल इंडे हे उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)