*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य देखील प्रेरणा देणारे :मराठी अभिनेता स्वप्निल जोशी*
न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य देखील प्रेरणा देणारे :मराठी अभिनेता स्वप्निल जोशी*

🔶अक्कलकोट : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य देखील प्रेरणा देणारे असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी अभिनेता स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, सौरभ मोरे, दत्ता माने, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
