सामान्य माणूस ते आंतरराष्ट्रीय चित्रकार आणि आता चित्रपट दिग्दर्शक !
अतिशय सामान्य कुटुंबातून चित्रकलेत जागतिक पातळीवर ठळक ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेलं व्यक्तिमत्त्व म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रकार शशीकांत धोत्रे.
शशीकांत यांचा मुंबई बरोबरच सोलापूर च्या शिरापूरमध्ये अद्यावत स्टुडिओ असून, त्यातून देशाबरोबर जगभरात त्यांनी नावलौकिक प्राप्त केलाय.
त्यांच्या पोर्ट्रेटवर जीवंत चित्र साकारल्याचा भास निर्माण होतो. आजवर अत्यंत सुंदर चित्रांचे पेंटिंग्ज जगभरात पोहोचलीत, विविध स्तरांतील अनेक महनीय व्यक्तींच्या दालनात त्यांचं पेंटिंग दाखल झालंय. ही ग्रामीण युवावर्गात भूषणावह व अभिमानास्पद बाब आहे.
त्यांनी लिहीलेला व दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट सजना 27 जून ला राज्यभरातील चित्रपट गृहात प्रदर्शित होतोय.
चित्रकलेत जसं त्यांचं नाविन्यपूर्ण काम आहे तसंच चित्रपटात देखील नाविन्य पहावयास मिळेल असंच वाटतंय त्याचं कारण असं, सजनाचा ट्रेलर व सुमधूर गाणी सिनेरसिकांच्या विश्वात सध्या प्रचंड प्रमाणात गाजतायत.
एकंदरीत त्यांचा आजवरचा प्रवास पाहता चित्रपट उद्योगात देखील ते सजना च्या माध्यमातून लौकिक निर्माण करून उत्कृष्ट दिग्दर्शक निर्माता म्हणून उदयास येणार असल्याचा मनोमन विश्वास वाटतो.
त्यांचं व त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन ! व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!!

तुमच्या नि माझ्या जगण्यातला सजना उद्याच्या 27 ला महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आपण सहपरीवार आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन सजना मराठी चित्रपट नक्की पहावा.