*राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बनले देवदूत*
चंद्रपूर येथील लहान मुलांच्या मोफत हृदय शश्त्रक्रिया ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये होणार.
राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त हे संपूर्ण वर्ष एकनाथ हीरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर ९ फेब्रुवारी पासून आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्याच दृष्टिकोनातून राज्यात जन्माला आलेल्या ज्या लहान मुलांच्या हृदयाला छिद्र आहे अशा मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात करत आहेत. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे यासाठी राज्यभर जनजागृती करत आहेत.
आज चंद्रपूर येथील १५ मुलांना ऑपरेशनसाठी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले आहे. या सर्व मुलांची आज २डी इको तपासणी करण्यात आली असून त्या सर्व मुलांची मोफत हृदय शश्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या सर्व लहान मुलांची व त्यांच्या पालकांची उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी भेट घेतली. या भेटीत मंगेश चिवटे यांनी लहान मुलांशी संवाद साधला, सोबतच पालकांना देखील काळजी न करण्याचे सांगितले. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, आपण कोणतीही काळजी करू नका, तुमहाला कुठलाही खर्च येणार नाही. असे चिवटे यांनी पालकांना समजावून आश्वासित केले. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला.
*उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे आवाहन*
राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा ६० वा वाढदिवस शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर विविध प्रकारचे आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहे. त्यापैकी लहान मुलांसाठी देखील २डी इको चाचणी आणि गरज असल्यास हृदयाची मोफत शश्त्रक्रिया देखील शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात करून देत आहोत. या ऑपरेशनसाठी लाखो रुपयांचा खर्च येत असतो आणि तो खर्च पालकांना परवडत नाही, म्हणूनच संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोफत शाश्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन पालकांना मोठा दिलासा दिला आहे. जर कुणाच्याही मुलाच्या हृदयाला छिद्र असेल तर, अशा पालकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही मुलाचे ऑपरेशन मोफत करून देऊ.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!