गावगाथा

तोळणूरच्या सुपुत्राचा कर्नाटक के-सेट परीक्षेत दैदिप्यमान यश

यशोगाथा

तोळणूरच्या सुपुत्राचा कर्नाटक के-सेट परीक्षेत दैदिप्यमान यश


अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे सुपुत्र श्री. श्रीशैल बसवराज चानकोटगी यांनी कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा (K-SET) यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे तोळणूरसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्नाटक परीक्षा प्राधिकरण, बेंगळुरू यांच्या वतीने नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा (K-SET) मध्ये श्री. चानकोटगी यांनी भौतिकशास्त्र (Physical Science) या विषयात उल्लेखनीय यश संपादन केले. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी बेंगळुरू येथील केईए कार्यालयात त्यांना के-सेट उत्तीर्णतेचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या श्री. चानकोटगी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे. साध्या कुटुंबातून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.
सध्या श्री. चानकोटगी हे नागरबेट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात ते विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या यशामागे तोळणूरचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. धनय्या कौटगीमठ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या या यशाबद्दल तोळणूर गावाचे सरपंच श्री. मानगुली तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गावातील युवकांनीही त्यांचे स्वागत करून शुभेच्छांचा वर्षाव केला. श्री. चानकोटगी यांच्या यशामुळे तोळणूर गावाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी ग्रामस्थांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून भविष्यातही ते शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button