गावगाथा

मुख्याध्यापिका रेखा लक्ष्मण सोनकवडे सावित्रीरत्न पुरस्काराने सन्मानित .

सन्मान पुरस्कार

मुख्याध्यापिका रेखा लक्ष्मण सोनकवडे सावित्रीरत्न पुरस्काराने सन्मानित .

अक्कलकोट (प्रतिनिधी ) सावित्रीबाई फुले शिक्षण व बहुउद्देशिय संस्थेतर्फे सावित्रीरत्न पुरस्कार जि .प .प्राथमिक मराठी शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ .रेखा लक्ष्मण सोनकवडे यांचा आखील भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते देण्यात आला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते मानपत्र शाल ट्रॉफी गुच्छ असा यतोचित सत्कार करण्यात आला .संस्थेचे अध्यक्ष व श्रीसंकेत साप्ताहिकचे सम्पादक श्री .महादेव जंबगी यांचे नियोजन व कार्यपद्धती वाखाणण्याजोगी होती .प्रस्ताविकेतून संस्थेची व इतर सामजिक कार्याची माहिती सांगितली .सावित्रीरत्न पुरस्कार निवड व त्यांचे कार्य याबद्दल माहिती दिली . रेखा सोनकवडे यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने गौरव केलेला आहे .त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्काराने प्रेरणा दिलेली आहे .कार्याचा आनंद घेण्यासाठी पुरस्काररुपी शाबासकीची थाप त्यांना कायम मिळत राहिली .रेखा सोनकवडे यांचे पती मा .माध्यमिक मुख्याध्यापक लक्ष्मण सोनकवडे यांची कायमच साथ लाभली आहे .त्यांची मुलं प्रियांका प्रवीण प्रदीप यांना नेहमीच आईच कौतुक आहे .आनंद देण्यासाठी तत्पर असतात .मनिषा कमलेश पणर्श्री पंचप्पा यांनी कायम साथ व शुभेच्छा दिलेल्या आहेत .रेखा सोनकवडे यांच्या आनंदासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य पाठीशी उभा असतो . याप्रसंगी महादेव बेल्ले भाजप दक्षिण मंडळ अध्यक्ष सुनील खेड गुरु बिराजदार भीमाशंकर बिराजदार संस्थेचे प्रमुख महादेव जंबगी लक्ष्मण सोनकवडे पंचप्पा सोनकवडे रेखा स्वामी संध्या सरवदे राजेश्री केदार इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button