गावगाथा

कुळ, जाती, धर्मपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे – प्रवचनकार आरती काळे

श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील ७ व्या पुष्पमालेत नवविधा भक्ती प्रकारांवर प्रवचनकार आरती काळे यांचे विश्लेषण.

कुळ, जाती, धर्मपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे – प्रवचनकार आरती काळे

श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील ७ व्या पुष्पमालेत नवविधा भक्ती प्रकारांवर प्रवचनकार आरती काळे यांचे विश्लेषण.

(श्रीशैल गवंडी, दि.०९/०४/२६.अ.कोट)
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज, सावता माळी आदि संतांनी लोकामध्ये भक्तीभाव निर्माण केला आहे. आपण संतांच्या विचार सारणीने जीवनात मानसपुजा नानाविध भक्ती, अर्चन, भक्ती करावी. भक्तीमध्ये लीनता हवी. अंहकार नसावा. दास्य भक्ती, सख्य भक्ती हे भक्तीचे प्रकार श्रेष्ठ मानले गेले आहेत. यामध्ये कुळ,जाती, धर्मपेक्षा भक्ती श्रेष्ठ असल्याचे विश्लेशण अक्कलकोटचे प्रवचनकार आरती काळे यांनी केले. आज श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील ७ व्या पुष्पमालेतील पहिल्या सत्रातील नवविधा भक्ती प्रकारांवर जेष्ठ लेखिका, कवियत्री,
तथा प्रवचनकार आरती काळे यांनी प्रवचनाद्वारे विश्लेषण केले.


प्रवचनकार आरती काळे यांनी पुढील प्रवचन सेवेत विशद करताना म्हणाल्या की येणाऱ्या एक हजार वर्षात श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचे व स्वामी भक्तीचे प्रकार आणखीन मोठ्या स्वरुपात विस्तार होतील. शरीराने जरी स्वामी आज आपल्यात नसले तरी अंतर आत्म्याने पुढील काळात ते सातत्याने भाविकांसोबत आहेत त्यामुळे आधुनिक काळात स्वामी भक्ती ही भाविकांसाठी फलदायी आहे. सध्या प्रत्येकाला मोबाईलचे व्यसन झाले आहे. सध्याच्या पिढीचे मोबाईलवर खुप प्रेम आहे. जगोध्दाराकरिता संतानी वेळोवेळी अवतार घेतला. कीर्तन हा भक्तीचा प्रकार आहे. श्रवण भक्ती करा. नित्य भगवंताचे स्मरण करा, भगवंताचे चिंतन करा. भक्त प्रल्हादासारखे भगवंताचे नामस्मरण करा.
सध्याच्या पिढीचे प्रेम मोबाईलवर आहे तसे देवावर प्रेम करा. वारकरी संप्रदायमुळे जातीभेद लिंगभेद नष्ठ झाला. अनेक संतांनी प्रादेशिक भाषामध्पे संत साहित्य निर्माण केले. देवापासुन विभक्त होत नाही तो भक्त. कर्मात देव पहा असे बोधपर विचारही जेष्ठ लेखिका कवियत्री तथा प्रवचनकार आरती प्रसाद काळे यांनी व्यक्त केले. प्रवचन सेवेपुर्वी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रवचनकार आरती काळे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. याप्रसंगी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वत महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे,
प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, श्रीशैल गंवडी, मनोज जाधव, ऋषी लोणारी, स्वामी लोणारी, काशीनाथ इंडे, बाळासाहेब कुलकर्णी, राजु भोसले, महादेव तेली, लक्ष्मण पाटील, प्रसाद सोनार, अशोक कडगंची, ओंकार पाठक, अक्षय सरदेशमुख, गिरिष पवार, संजय पवार, रमेश शिंदे, सुनिल पवार, बाळासाहेब घाटगे, मनोहर देगावकर, महादेव तेली, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, दर्शन घाटगे, मनोज इंगुले, आदीत्य गवंडी आदींसह बहुसंख्य स्वामी भक्तांनी उपस्थित राहून या प्रवचन श्रवणातून बोध घेतला.

फोटो ओळ – प्रवचनकार आरती काळे यांचा सत्कार करताना महेश इंगळे, तर दुसऱ्या छायाचित्रात धर्मसंकीर्तन महोत्सव व्यासपीठावर प्रवचन सेवा अर्पण करताना आरती काळे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button