संतांचं हृदय हे सामान्य जनांचं दुःख पाहून कळवळतं – कीर्तनकार ह.भ.प.सीमा आयाचित
श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील आकराव्या पुष्पमालेतील नारदीय कीर्तन सेवेत पुण्यातील कीर्तनकार ह.भ.प.सीमा आयाचित यांचे निरुपण.
(श्रीशैल गवंडी, दि.१३/०४/२६.अ.कोट)
संतांचं हृदय हे सामान्य जनांचं दुःख पाहून कळवळतं असे निरुपण पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प.सीमा आयाचित यांनी केले. त्या येथील श्री. स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवाच्या आकराव्या पुष्पमालेत ‘संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करताना विशद केले.
या नारदीय कीर्तन सेवेत पुढे विशद करताना निरुपण केले की संत सज्जन आपल्या मधुर वाणीने अखील समाजास आपलेसे करतात, त्यांच्या मनातील नकारात्माकता काढून टाकतात आणि जीवाचा उध्दार करतात. ‘अवतार तुम्हा धराया तारण, उध्दराया जन जड जीवा’
हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून संत आणि सज्जनांबद्दल सांगीतले आहे. त्यांच्या संगतीमध्ये परमेश्वराचा साक्षात्कार होतो. संत सज्जनांच्या चरणी बसून त्यांची सदैव सेवा करणे हाच खऱ्या भक्ताला मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे. संतांच्या, ग्रंथांच्या, सत्पुरुषांच्या संगतीत आत्मोद्धाराचा मार्ग सापडतो आणि सामान्य माणसाचे जीवन कॄतकृत्य होवून जाते, त्यासाठी सनातन धर्म संस्कृती जपण्याचा मार्ग प्रत्येकाने आत्मसात केला पाहीजे असाही उपदेश
संत महतांचे विविध दाखले देत आपल्या कीर्तन सेवेतून कीर्तनकार ह.भ.प.सीमा आयाचित यांनी केला. सर्वांनी जीवनात संतांचे नित्य स्मरण करावे. ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांचाही सर्वानी नियमीत पणे नामजप करावे. जीवनात भक्ती व सेवेला विशेष स्थान द्यावे असे आवाहनही शेवटी उपस्थित श्रोत्यांना कीर्तनकार ह.भ.प.सीमा आयाचित यांनी केले. या कीर्तन सेवेत त्यांना तबल्यावर व हार्मोनियमवर मयूर स्वामी व स्वामी बंधूंनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा.ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार ह.भ.प.सीमा आयाचित व सह कलाकारांचा श्री स्वामी प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी देवस्थानचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, अक्षय सरदेशमुख, संतोष देगांवकर, मनोहर
देगांवकर, स्वामीनाथ लोणारी, संजय पाठक, डॉ.मल्लीनाथ बोधले सर, ज्योती जरीपटके, लता कुलकर्णी, दिपक
जरीपटके, प्रसाद पाटील सर, रमेश शिंदे सर, प्रा.शिवशरण अचलेर, मयूर स्वामी,
बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सुनिल पवार, आकाश चव्हाण, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, संजय पवार, अमर पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, श्रीमुख जगदाळे, मनोज जाधव, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे यांच्यासह असंख्य स्वामीभक्त व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून या कीर्तन सेवेतून बोध घेतला.
फोटो ओळ – वटवृक्ष स्वामी मंदिरात कीर्तनसेवा सादर करताना ह.भ.प. सीमा आयाचित व सहकारी दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!