गावगाथा

सोलापूरच्या रसिका-सानिका कुलकर्णी यांच्या सुमधुर गायनात भाविक तल्लीन.

१४८ व्या स्वामी पुण्यतिथीच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील ७ व्या पुष्पमालेत रसिका-सानिकांच्या गायन सेवेत भाविक मंत्रमुग्ध.

सोलापूरच्या रसिका-सानिका कुलकर्णी यांच्या सुमधुर गायनात भाविक तल्लीन.

१४८ व्या स्वामी पुण्यतिथीच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील ७ व्या पुष्पमालेत रसिका-सानिकांच्या गायन सेवेत भाविक मंत्रमुग्ध.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०९/०४/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात आज सोलापूरच्या रसिका-सानिका कुलकर्णी यांच्या सुमधुर गायनात भाविक तल्लीन झाले. श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित
धर्मसंकीर्तन महोत्सवात सातव्या पुष्पमालेतील दुसरे सत्र आज सोलापूरचे गायिका रसिका सानिका कुलकर्णी यांच्या भक्तीमय गायन सेवेने गुंफले.
या गायन सेवेत रसिका – सानिका कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची सुरुवात
सूर निरागस गणेश वंदन गीताने केली.
यानंतर वृंदावनी वेणू, स्वप्नांत आले, माझ्या गुरुदेव दत्त, उघड नयन देवा, पराधीन आहे जगती, कानडा राजा पंढरीचा इत्यादी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित भक्तांनी उत्साहपुर्ण टाळयांच्या गजरात साथ दिली. श्रोत्यांचा हा उत्साह शेवटपर्यंत कायम होता. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर अक्षय भडंगे, ऑक्टोपॅडवर यश जवळकर, साऊंड सिस्टीमवर प्रकाश कासेगांवकर,
यांनी साथसंगत केली.कार्यक्रमाचे निवेदन अभिषेक परदेशी यांनी केले.


कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रा.ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांनी गायिका रसिका-सानिका कुलकर्णी व मनिषा –
जतीन कुलकर्णी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी कुलकर्णी कुटूंबियांच्या वतीनेही मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचा शाल श्रीफळ देवून जतीन कुलकर्णी यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब कुलकर्णी, जतीन कुलकर्णी, मनिषा कुलकर्णी, सुरेश भोसले सर, प्रशांत गुरव, गणेश दिवाणजी, वेदेश गुरव, प्रसाद पाटील सर, संदीप पंडीत, रमेश शिंदे सर, अमर पाटील, मनोज जाधव, स्वामीनाथ लोणारी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, मनोज इंगुले, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, आदीत्य गवंडी, श्रीमुख जगदाळे, दिपक जरिपटके, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, नरसिंग क्षीरसागर, सागर गोंडाळ, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी, संतोष पराणे, प्रसाद सोनार, श्रीशैल गवंडी, संतोष जमगे, महादेव तेली, खाजप्पा झंपले यांच्यासह राज्याच्या कानाकोपरयातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्तांनी उपस्थित राहून या भक्तीमय गायन सेवेचा आनंद लुटला.

फोटो ओळ – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भक्ती संगीत गायन सेवा सादर करताना रसिका – सानिका कुलकर्णी व सहकलाकार दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button