गावगाथा

बुधवारी श्री ​वटवृक्ष मंदिरात स्वामींचा पुण्यतिथी उत्सव.

बुधवारी श्री ​वटवृक्ष मंदिरात स्वामींचा पुण्यतिथी उत्सव.

HTML img Tag Simply Easy Learning    

विवीध धार्मिक कार्यक्रमांसह पारंपारीक पालखी सोहळा, व भोजन महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा – महेश इंगळे

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, दि.१३/०४/२६.अकोट)
येथील वटवृक्ष देवस्थान (मुळस्थान) येथे मंदिर समितीच्या वतीने सालाबादा प्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४८ वा पुण्यतिथी उत्सव बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुण्यतिथी दिनी पहाटे २ वाजता मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे- प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहनराव पुजारी (गुरुजी) यांच्या अधिपत्याखाली पुरोहित मंदार महाराज पुजारी व पुरोहित व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती होईल. तदनंतर श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण होईल. पहाटे २:३० ते पहाटे ४ या वेळेत नगर प्रदक्षिणा पार पडेल. यानंतर पहाटे ४ वाजता अक्कलकोट राजघराण्याचे व सकाळी ६ वाजता देवस्थानच्या वतीने श्रींना पारंपारिक लघुरुद्र अभिषेक करण्यात येईल. सकाळी ७ वाजता मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे-प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या भजनाने देवस्थानच्या ज्योती मंडपात नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा होईल.

HTML img Tag Simply Easy Learning    

सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता दर्शन रांगेची विशेष सोय करण्यात आली आहे. स्वामी भक्तांच्या वतीने नित्य नियमाने होणारे अभिषेक भाविकांचे दर्शन सुलभतेने होणेकरीता बंद ठेवण्यात येतील. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ, प्रसाद मिळेल. सकाळी ११ वाजता चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत देवस्थानची महानैवेद्य आरती पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते संपन्न होईल.

HTML img Tag Simply Easy Learning    

दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या वतीने श्रींची आरती करून महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिराच्या पुर्वेकडील उपहारगृहात सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे. सायंकाळी ५:३० ते रात्री १० या वेळेत श्रींचा सजविलेला सवाद्य पालखी मिरवणुक सोहळा वटवृक्ष मंदिरातुन निघेल. पालखी मार्ग फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार, कारंजा चौक, बुधवार पेठ, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक, दक्षिण पोलीस स्टेशन समोरून मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली, स्वामी गल्ली असे असेल.

वटवृक्ष मंदिरात रात्री १० वाजता पालखी सोहळा आल्यानंतर देवस्थानच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना शीरा प्रसाद वाटप करणेत येईल. दिनांक १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत मंदिरात गोपाळकाला होवून श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सांगता समारंभ होईल. दिनांक १७ एप्रिल वार रोजी देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष हॉल येथे सर्व स्वामी भक्त, सेवेकरी, भजनकरी, विणेकरी, प्रभात फेरीस येणारे भाविक, पारायणास बसलेले भाविक, नामवीणा सप्ताह सोहळ्यात सहभागी झालेले भाविक, धर्म संकीर्तन महोत्सवात सहभागी झालेले भाविक, श्रींच्या नित्य सेवेत सभागी झालेले भाविक, देवस्थान कर्मचारी, सेवेकरी, सर्व पोलीस कर्मचारी, व तात्काळ उपस्थित असलेल्या भाविक यांना दुपारी १२ ते ३ या वेळेत भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे, तरी सर्वांनी श्रींच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा, पालखी सोहळा सेवेचा, व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button