कै.रूपालीताई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चुंगीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

(अ.कोट, श्रीशैल गवंडी) दि.२८/०६/२५ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.रूपालीताई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज स्विमींग ग्रुपचे सदस्य बाळासाहेब एकबोटे यांच्या वतीने शालेय समितीचे अध्यक्ष तानाजीराव चव्हाण, मुख्याध्यापक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते तालुक्यातील चुंगी येथील फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे (वह्या, पेनचे) वाटप करण्यात आले. बाळासाहेब एकबोटे मित्र परिवाराच्या वतीने ६०० वह्या व पेनचे वाटप करून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक किरण गायकवाड यांनी महेश इंगळे व इंगळे कुटुंबीय परिवार हे पूर्वीपासूनच सामाजिक उपक्रमात नेहमीच भाग घेत असतात. समाजाच्या तळागाळातील नागरिक, विद्यार्थी, अबालवृद्धांना सहकार्य करून नेहमीच मदतीचा हात देत असतात. या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या जीवनाशी त्यांची आपुलकीची बांधिलकी असलेली जाणीव होत असते असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब एकबोटे मित्र परिवारातील सदस्य श्रीकांत झिपरे यांनी बोलताना ‘विद्या विनयेन शोभते’ या संस्कृत उक्तीप्रमाणे विनयशीलता, नम्रपणा हे गुण महेश इंगळे यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेले आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी व आमच्या ताई कै.रुपालीताई यांना देखील मी अगदी लहानपणापासून ओळखत असून ते माझ्या नेहमीच संपर्कात होत्या. त्यांचाही नम्र स्वभाव हा प्रत्येकाला आदरयुक्त व आधार युक्त वाटायचा. नम्रताच विद्यार्थ्यांना शिक्षणात यश संपादन करण्यास प्रेरित करीत असते म्हणून आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान महेश इंगळे व कै.रूपालीताई इंगळे यांच्या नम्रपणाची व या नम्रपणामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे व या कामी त्यांची स्मृती नेहमीच विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात राहावी याकरिता विद्यार्थ्यांना कै. रूपालीताईंची प्रतिमा असलेले ६०० वह्यांचे आज येथे वाटप करण्यात आले असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कामात आमचे परममित्र व स्विमिंग ग्रुपचे सदस्य बाळासाहेब एकबोटे यांचे मोलाचे योगदान असल्याचेही मनोगत व्यक्त केले. यावेळी
सचिन निंबाळकर, आनंदराव माने, दीपक पडोळकर शेख, प्रतिभा एकबोटे मॅडम,
एस.ए.राठोड, स्विमींग ग्रुप परिवारचे सदस्य
बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, श्रीकांत झिपरे, सुनील पवार, मनोज इंगुले, रमेश शिंदे, बाबा सुरवसे, रमेश भंडारी, नंदकुमार जगदाळे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, ओंकार महाडीक, आदीत्य गवंडी, संतोष पराणे, काशिनाथ सोलनकर, तन्मय इचगे आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व चुंगीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत झिपरे यांनी केले तर आभार गायकवाड सर यांनी मांडले.
फोटो ओळ – विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करताना प्रथमेश इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक के.एस.गायकवाड व अन्य मान्यवर दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!