“हरळय्या नगरातील गरजू विद्यार्थ्यांना पुण्याहून पाठ्यपुस्तकांची मदत : इलाही सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम”
सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम

“हरळय्या नगरातील गरजू विद्यार्थ्यांना पुण्याहून पाठ्यपुस्तकांची मदत : इलाही सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम”
(प्रतिनिधी) :
सामाजिक भान आणि शिक्षणप्रेम जपत, आज दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी सोलापूर शहरातील विमानतळ परिसरातील हरळय्या नगर येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले.

या उपक्रमामध्ये पुणे येथील इलाही सोशल फाउंडेशनचे संस्थापक मा. पैगंबर शेख यांच्या पुढाकारातून आणि सामाजिक कार्यकर्त्या मा. सुवर्णाताई कांबळे यांच्या अथक प्रयत्नातून हे पुस्तक वितरण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमास मा. रविंद्रभाऊ खैरे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत झाली आहे. समाजातील सर्व घटकांनी अशा उपक्रमांना पाठबळ द्यावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. याप्रसंगी पालक आणि विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण होते.

सामाजिक जाणिवेतून उभा राहिलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिक्षणासाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेली ही टीम निश्चितच कौतुकास पात्र आहे.

