गावगाथा

प्रचंडे प्रशालेत विठ्ठल दिंडीचे रिंगण सोहळा उत्साहात संपन्न.

दिंडी विशेष

प्रचंडे प्रशालेत विठ्ठल दिंडीचे रिंगण सोहळा उत्साहात संपन्न.

नागणसूर प्रतिनिधी दि.०५, अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या प्रारांगणात आषाढ एकादशी निमित्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले पंढरपूरच्या विठ्ठल दिंडीचे रिंगण सोहळा इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीने सर्व शिक्षकांच्या सहकार्याने उत्साहात पार पाडले. विठ्ठल नामाच्या गजरात शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनीने भक्तिमय वातावरणात फुगडी खेळ खेळून आनंद लुटले. दिंडी सोहळ्याच्या सुरुवातीला विठ्ठल दिंडीचे पूजन प्रशालेचे प्राचार्य शंकर व्हनमाने, ज्येष्ठ शिक्षिका सुनीता अलुरकर, प्राध्यापक चिदानंद मठपती आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर विठ्ठल दिंडी पालकीसह विठ्ठल नामाच्या गजरात प्रशालेतून प्रारंभ होऊन गावात मुख्य रस्त्याने गावभर मिरवणूक काढून गावकरी भक्तांना  विठ्ठल दर्शनाचे लाभ मिळवून दिले. विद्यार्थिनीने विठ्ठल नामाचे गीत सादर करुन तिची महती समजावून सांगितले व  ठिकठिकाणी चौकात फुगडीचा खेळ रंगला. शेवटी सदर विठ्ठल दिंडी व पालखी ग्रामपंचायत नागणसूर कार्यालयासमोर सरपंचपती महादेव चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष विश्वनाथ प्रचंडे यांच्यासह प्रतिष्ठित ग्रामस्थ, प्रशालेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनीं यांच्या समवेत विठ्ठल दिंडीचे समारोप करण्यात आले. यावेळी प्राचार्य शंकर व्हनमाने सदर दिंडीचे महत्व सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले. विठ्ठल दिंडी यशस्वी होण्यासाठी सहशिक्षक संजयकुमार गंगदे, विश्वनाथ वाघमोडे , अजय पाटील ,सोमशेखर कळसगोंडा, प्राध्यापक ईरण्णा धानशेट्टी, अनिल इंगळे, शरणप्पा मणरे, प्रशांत नागूरे, चिदानंद मठपती, बसवराज कोळी, सहशिक्षिका प्रीती प्रचंडे, प्रमिला विभुते, प्रचंडे, डोंगरीतोट, करोटे मॅडम, नितीन धानशेट्टी, आकाश कोनापुरे, आकाश धोत्री, शिक्षकेतर कर्मचारी थावरू चव्हाण, चनवीर कल्याण, अर्चना मणूरे, सागर पोद्दार, माणिक किणगी आदी सर्वजण परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button