भाविकांसाठी वटवृक्ष मंदीरात स्वामी दर्शनाची व्यवस्था उत्कृष्ट पध्दतीची
श्री.स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक
यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, सोलापूर,दि.६/७/२०२५)
श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत आहे. भाविकांसाठी वटवृक्ष मंदीरात स्वामी दर्शनाची व्यवस्था उत्कृष्ट पध्दतीची असल्याचे मनोगत ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास परिवार सदस्यांसह भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक व कुटूंबियांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक बोलत होते. पुढे बोलताना पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची सेवा म्हणजे उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, आदित्य पाटील, प्रथमेश इंगळे, होटकर,
प्रसाद सोनार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक व कुदूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!