गावगाथा

अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात‘हास्य जत्रेतील कलाकारांनी रंगत आणली….

विशेष गौरव :* जेष्ठ पत्रकार, अभय दत्तात्रय दिवाणजी यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात‘हास्य जत्रेतील कलाकारांनी रंगत आणली….
अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*ख्यातनाम हास्य कलाकार समीर चौगुले, ओंकार राऊत, यांचा “महाराष्ट्राची हास्य जत्रा” या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सामाजिक, राजकीय चालू घडामोडीवर विनोदातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हास्य फवाऱ्याने सदरचा कार्यक्रम गाजला या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.*
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, रविवारी “महाराष्ट्राचे हास्य जत्रा” सादरकर्ते समीर चौगुले, ओंकार राऊत, अरुण कदम, प्रभाकर मोरे, शामसुंदर राजपूत, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर, अमीर हडकर, शिवाली परब, शाम बांगर, सद्गुरू जुवेकर, सुनील डांगे, दशरथ शिरसाट आणि सहकारी यांचा धमाल उडवणारा ह्या कार्यक्रमाने ७ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन : अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, सो.म.पा. सचिन ओम्बासे, ईश्वरजी सुर्यवंशी, धर्मादाय उपायुक्त सोलापूर, संजय पाईकराव, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सोलापूर, शिवाजीराव पाटील, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सोलापूर, सुमित शिंदे- प्रांताधिकारी, सोलापूर, दिलीपराव पवार, जिल्हा नियोजन अधिकारी, सोलापूर, अॅड.नितीन हबीब साहेब, जेष्ठ विधीज्ञ, मानद कायदेविषयक सल्लागार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट, अॅड. श्री. जयदिप माने, विधीज्ञ, सोलापूर, अॅड. श्री. पी.बी. लोंढे पाटील, श्रीमती शुभांगीताई चव्हाण, चित्रकार, पुणे, डॉ.शरणबसप्पा दामा, शिवसंतोषी हॉस्पिटल, सोलापूर, विक्रम खेलबुडे-अध्यक्ष, श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर, मनिष केत- संपादक, बी.आर.न्यूज, मल्लिकार्जुन पाटील, दत्ताअण्णा सुरवसे,उद्योजक, सोलापूर, महेश हिंडोळे, मा.उपनगराध्यक्ष, अक्कलकोट नगरपरिषद, अशपाक बळोरगी, आनंद तानवडे, मा.पक्षनेते, जिल्हा परिषद, सोलापूर, दिलीपभाऊ सिद्धे, जावेद पटेल, मिलन कल्याणशेट्टी, मा.नगरसेवक, बसलिंगप्पा खेडगी, चेअरमन, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी, उत्तम गायकवाड मा.नगरसेवक, सुनिल बंडगर(पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष), यशवंत डावकर, यशवंततात्या धोंगडे, मा.उपनगराध्यक्ष, प्रदिप पाटील, मा.सरपंच, संजयजी उर्फ लाला राठोड, अविनाश मडीखांबे, शिवराज स्वामी, अॅड.प्रणित जाधव, हिरा चकोले, गिरीश कोल्हापुरे, अभिषेक आकतनाळ, अल्ताफ पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले व मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
चित्रकार शुभांगी चव्हाण पुणे यांनी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांची प्रतिमा कार्यक्रमाप्रसंगी भेट दिली.
चौकट :
*विशेष गौरव :* जेष्ठ पत्रकार, अभय दत्तात्रय दिवाणजी यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चौकट :
*गुणीजन गौरव :* सुभाष निंगप्पा धर्मसाले, (सहाय्यक महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय, अक्कलकोट), जावेद अहमद महमंद हनीफ खैरदी, (कायदा अधिकारी, सोलापूर विद्यापीठ), प्रा.डॉ.श्रीनिवास सुभाष जगताप, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स,सोलापूर, विशाल तात्यासाहेब घाटगे, सेवेकरी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट :
*गुणवंत विद्यार्थी गौरव :*
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
चौकट :
दि. ७ जुलै रोजी सोमवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत “शरण-गुरु-चरण” नृत्यशैलीमधून गुरुवंदन सादरकर्ते – गुरु आभा वांबूरकर, गुरु स्मिता महाजन आणि शिष्यवर्ग, पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, सुनंदा अष्टगी, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, अश्पाक काझी, स्वामिनाथ गुरव, ओंकारेश्वर उटगे, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, राजु नवले, शितल जाधव, अनिकेत सोनटक्के, बालाजी पाटील, निखील पाटील, अप्पू कलबुर्गी, अशोकराव मलगोंडा, आकाश शिंदे, रोहन शिर्के, सागर गोंडाळ, स्वप्नील शहा, महेश शिर्के, डॉ. विनायक बुदले, संभाजीराव लोंढे, किरण पाटील, अप्पासाहेब कोतली, अमोल कोकाटे, दिनेश पटेल, सुनील गोरे, चिदानंद स्वामी, रुद्रय्या स्वामी, प्रा. सायबण्णा जाधव, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, सोमशेखर जमशेट्टी, किरण जाधव, आकाश गंगणे, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, दहिटणे सरपंच- नितीन मोरे, आकाश गडकरी, कुमार सलबत्ते, लक्ष्मण विभूते, अक्षय मोरे, गणेश पाटील, शहाजीबापू यादव, कुमार पाटील, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, स्वामिनाथ बाबर, आकाश शिंदे, यश विभूते, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, राजू पवार, तानाजी पाटील, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रशांत साठे, गोविंदराव शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, अभिषेक झिपरे, रोहित कदम, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button