मोहरम निमित्त सामाजिक कार्यकर्ते आझम भाई शेखजी यांच्यावतीने शरबत वाटपाचा उपक्रम
दुधनी (प्रतिनिधी) – दुधनी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आझम भाई शेखजी यांच्या वतीने मोहरम निमित्त शरबत (सुगंधी दूध) वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक सलोखा, मानवतेचा संदेश आणि मोहरमच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमावेळी अक्कलकोट तालुक्याचे दानशूर कर्ण शंकर मालक म्हेत्रे, मुस्लिम समाज अध्यक्ष जीलानी नाकेदार, युवा नेते बसवराज हौदे, बसवराज गुरूभेटी, सिद्धाराम गद्दी, मनोज गद्दी, जाविद शेखजी, महेबुब शेखजी, यासीन शेखजी, अशपाक शेखजी, गैस शेखजी, हसन शेखजी, साजिद शेखजी, सैयद जमादार, अली जिडगे, मेहराज जिडगे तसेच शेखजी कंपनी ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे समाजात बंधुता, प्रेम आणि एकोपा निर्माण होतो, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. आझम भाई शेखजी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम यशस्वी केला. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!