*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात बुधवारी रोजी सायंकाळी दक्षिण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.*
सालाबादाप्रमाणे यंदाही श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. सदरील पुजा ही सोमवार दि. १६ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आली असून, शमीवृक्षाखाली गेल्या ३४ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांचा न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विविध धार्मिक विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली.
यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त लक्ष्मण पाटील, आप्पा हंचाटे, सौरभ मोरे, प्रा.शिवशरण अचलेर, प्रल्हाद पाटील, पो.कॉ.अंबादास कोल्हे, अतिश पवार, गोटू माने, प्रविण घाटगे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, धानप्पा उमदी, चंदू हिबारे, बाळासाहेब घाडगे, रोहन शिर्के, संभाजीराव पवार, पिंटू साठे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, सुमित कल्याणी, अनिल गवळी, गोरख माळी, बसवराज क्यार, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, सागर पवार, अनिल गवळी, महेश झपंले, पप्पू कोल्हे, सोमनाथ शिंदे, किरण साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!