*श्री कल्मेश्वर प्रशाला, सुलेरजवळगे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.*
निरोप समारंभ

*श्री कल्मेश्वर प्रशाला, सुलेरजवळगे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.*

*’विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश संपादन करण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य आणि परिश्रम हे गुण संपादन केला पाहिजे’ असे सुलेरजवळगे येथील श्री कल्मेश्वर प्रशालेतील इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना निरोप देताना ज्ञानसंपदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धारूढ बेडगनूर यांनी प्रतिपादन केले.*
*कार्यक्रमाची सुरवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजन करून अतिथिंचे सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमात इयत्ता दहावी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी हळव्या मनाने गुरुजनांचे गुणगौरव करत सृष्टी कापसे, सृष्टी राजुरे, मारुती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.*
*याप्रसंगी युवक शिक्षण प्रसारक मंडळ चे श्री रमेश शहा,मुख्याध्यापक श्री आदेप्पा कापसे, श्री मंगेश स्वामी, श्री सुयश खुने, श्रीम.धनश्री आकळवाडी यांनी आपले मनोगत व्यक्त करत दहावी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था पदाधिकारी श्री रामय्या स्वामी, श्री विश्वनाथ पालवे प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार देविदास गुरव यांनी केले*
