जनसेवा हिच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन वतीने गुणवंतांचा गौरव
जनसेवा हीच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशनचा उपक्रम

जनसेवा हिच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन वतीने गुणवंतांचा गौरव


हत्तूर — गावातील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये संपूर्ण गावातून विषेश प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या सर्व *गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव* आज दिनांक 18 जुन 2023 रोजी श्री सिद्धारुढ सांस्कृतिक भवन, हत्त्तुर येथे करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री राजकुमार नारायणे हे उपस्थित होते व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत भरले (जीवनधारा पतसंस्था), श्री सोमनिंग व्हनमाने (श्री सोमेश्वर पतसंस्था), श्री संजय मंमदापुरे (मॅनेजर श्री समर्थ सहकारी बँक, सोलापूर), श्री नागनाथ कलसुरे (एसटी महामंडळ, वाहक), सौ कांचन कुंभार (आशा वर्कर), सौ सुवर्णा शिलेणी (आशा वर्कर), ॲड अस्मिता बागवान हे उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमात गावातील व पंचक्रोशीतील खालील गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आले. कु. अफरोज सगरी, कु. सोमनाथ आकळवाडे, कु. रक्षिता भरले, कु. समीक्षा तेली, कु. संचिता पाटील, कु. अक्षता कोळी, कु. समृद्धी अवताडे, कु. अमोल राठोड, कु. वैष्णवी छपेकर, कु. अपेक्षा कांबळे, कु. श्रुती नारायणे, कु. प्राची भरले, कु. निकिता कुलकर्णी, कु. आरती कुंभार, कु. सोनाली चव्हाण.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करत “आयुष्य घडविताना….. (10 वी, 12वी नंतर काय करावे??)” या विषयी मार्गदर्शन श्री अमोघ पुजारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सुभाष डोगे, नीलकंठ पाटील, राघवेंद्र पाटील, परमेश्वर कुलकर्णी, राहुल पाटील, महेश अवताडे, विठ्ठल डोगे, स्वराज रोणे, विनय कोरे, मयुर पुजारी भीमाशंकर हिरकुर व जनसेवा हीच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.
