गावगाथा

अन्नछत्र मंडळात श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाची घटस्थापना उत्साहात संपन्न

नवरात्र विशेष

अन्नछत्र मंडळात श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाची घटस्थापना उत्साहात संपन्न

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोमवारी श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा, आरती व घटस्थापना चि. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले व कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाली. “आई राजा उदो उदो…! सदानंदाचा उदो उदो…!” या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.

HTML img Tag Simply Easy Learning    

न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने विधी पार पडला. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी चि. हर्षवर्धनराजे व कु. स्वामिनीराजे यांचा सत्कार न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, रोहन शिर्के, सागर पवार, नामा भोसले, अप्पा हंचाटे, राजेंद्र काटकर, बाबुशा महिंद्रकर, स्वामिनाथ बाबर, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, तानाजी पाटील, राजू पवार, महांतेश स्वामी, सिद्धराम कल्याणी, बलभीम पवार, प्रकाश माने, धानप्पा उमदी, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, विशाल घाटगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button