ऊरुस

उद्या पासून हैद्रा येथील ख्याजा पिर सैपुल मुलक दर्ग्याचे ८९० वा उरूसाला प्रारंभ…

हैद्रा येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन,लाखो भाविक भक्त दाखल होणार

उद्या पासून हैद्रा येथील ख्याजा पिर सैपुल मुलक दर्ग्याचे ८९० वा उरूसाला प्रारंभ…

हैद्रा येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन,लाखो भाविक भक्त दाखल होणार

अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ख्याजा पिर सैपुल मुलक दर्गा येथे ८९०वा उरूस निमित्त ८डिसेंबर ते१० डिसेंबर रोजी संदल,चिराग आदीसह विविध धार्मिक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दर्गा ट्रस्टीचे चेअरमन मिरासाब याकुबसाब मुजावर व व्हा.चेअरमन रफिक शिराजोद्दीन मुजावर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
तालुक्यातील हैद्रा येथील हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले सुप्रसिद्ध ख्याजा पिर सैपुल मुलक दर्ग्याचे उरुस दिनांक ८ डिसेंबर पासुन प्रारंभ होत असुन हजारो वर्षांच्या परंपरेप्रमाणे कर्नाटक येथील करजगी गावचे पाटील परिवाराच्या घरातुन ८
तारखेच्या रात्री ११ वाजता गंध निघून ९तारखेला पहाटे५वाजता हैद्रा दर्गा येथे दाखल होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता चिराग(दिवेबत्ती)चा कार्यक्रम तर१०तारखेला सकाळी ८ते दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम चालु राहणार आहे. ख्याजा पिर सैपुल मुलक या दर्गाचे उरुस सलग तीन दिवस चालणार असुन या ऊरुसमध्ये हिंदू – मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभाग नोंदवणार असून देशभरातुन भाविक मोठया संख्येने दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.
कर्नाटक,महाराष्ट्र सीमेवर वसलेले तीर्थक्षेत्र हैद्रा येथील प्रसिध्द ख्वाजा पीर सैफुलमुलक दर्ग्याचे हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा करजगी (कर्नाटक) येथील पाटील या कुटुंबाकडून गंध च्या माध्यामातून येऊन परंपरा अविरतपणे चालू असल्याची माहिती दर्गा ट्रस्टीचे चेअरमन मिरासाब मुजावर ,व्हा.चेअरमन रफिक मुजावर यांनी पत्रकाराशी बोलतांना सांगितले आहे.

चौकट :
चेअरमन मिरासाब(बाबूलाल)याकूबसाब मुजावर,
व्हा.चेअरमन रफिक(कादरी)मुजावर,वकील नबीसाब मुजावर,अ.रऊफ अहमद मुजावर, म.याकूबसाब मिरासाब मुजावर,जैनुद्दीन तालाबआली मुजावर,
सेक्रेटरी बंदेनवाज(शकील)तालाबअली मुजावर,
अहमद कादरबाशा मुजावर,बंदेनवाज शिराजोद्दीन मुजावर,अय्यूब वकील मुजावर आदीची उपस्थित राहणार आहे.

चौकट : –
धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक व्यक्ती, कुटुंब व समाज घटक येवून पवित्र दर्ग्यात नवस बोलतात.कालांतराने नवस पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी लोकसमुहाचा वर्दळ उरूस या वेळेस पाहवयास मिळत असते. सर्व जाती धर्माचे प्रतिक म्हणून या दर्ग्याकडे पाहिले जाते. भाविक भक्तांचा भावनांचा आदर दर्गा ट्रस्टीकडून जोपासले जातो.

मिरासाब मुजावर – चेअरमन हैद्रा ट्रस्ट अक्कलकोट

चौकट :
८९०वा ऊरुसनिमित्त हैद्रा येथे लाखों भाविक दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.त्यानिमित्त जयंत तयारी सुरू आहे.
रफिक शिराजोद्दीन मुजावर -व्हा.चेअरमन हैद्रा ट्रस्ट अक्कलकोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button