श्री विठ्ठलसाईचे रोलर पुजन संपन्न
(मुरुम प्रतिनीधी)
श्री विठ्ठलसाई कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५ – २६ साठीचे रोलरचे पुजन सोमवार (दि.२१) सकाळी १०.३० वाजता माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मा. श्री.बसवराजजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री पाटील साहेब म्हणाले की, हंगाम २०२५ – २६ मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप केले
जाईल. तसेच सक्षम ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करण्यात आली आहे. कारखाना मशिनरी
दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येत असून ऊस उत्पादक व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस देवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी काशी, श्रीशैल्यम व उजैन पीठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. बापुरावजी पाटील साहेब, उमरगा जनता सहकारी बॅकेचे चेअरमन मा. श्री. शरणजी पाटील साहेब, व्हा.चेअरमन सादीकसाहेब काझी, कारखान्याचे सर्व संचालक श्री केशव पवार, शरणप्पा पत्रिके, विठ्ठलराव बदोले, शब्बीर जमादार,विठ्ठलराव पाटील, राजीव हेबळे,दिलीप भालेराव, व्यंकटराव खरोसेकर, अँड. संजय बिराजदार, माणिकराव राठोड, संगमेश्वर घाळे,
सुभाष राजोळे, दिलीप पाटील, श्रीमती मंगलताई गरड, सौ. इरम्माताई स्वामी, शिवमुर्ती भांडेकर,शिवलिंग माळी, तसेच करंजकर महाराज सोलापूर, बिलाल काझी, शौकत पटेल, युसुफ मुल्ला,देवेंद्र कंटेकुरे, गणेश अंबर, साधुराम हिंडोळे, सतिश बालकुंदे व पत्रकार आदीसह कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे,कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!