गावगाथा

इंदापूर तालुक्यातील स्वामी भक्तांचा महेश इंगळे यांच्या हस्ते समर्थ सेवा पुरस्काराने सन्मान.

महेश इंगळे यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात संपन्न झाला पुरस्कार वितरण सोहळा

इंदापूर तालुक्यातील स्वामी भक्तांचा महेश इंगळे यांच्या हस्ते समर्थ सेवा पुरस्काराने सन्मान.
महेश इंगळे यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात संपन्न झाला पुरस्कार वितरण सोहळा
इंदापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा संघाचा स्वामी भक्तांसाठी स्तुत्य उपक्रम – महेश इंगळे
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२१/०७/२०२५)
इंदापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा संघाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमध्ये ग्रामस्थांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि नामजपाचे धार्मिक कार्य नियमितपणे संपन्न होत आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा संघाचे प्रमुख तथा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील
स्वामी भक्त हनुमंत काळे सर यांनी हा उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आरती आणि जप यांची जबाबदारी जे स्वामीभक्त घेतात अशा स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी सेवेचे औचित्य साधून “समर्थ सेवा पुरस्कार” प्रदान करण्याचे निश्चय केला आहे. ह्या नियोजनानुसार इंदापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा संघाचा स्वामी भक्तांसाठी हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. आज येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात इंदापूर तालुक्यातील १७ गावातील स्वामी भक्तांना समर्थ सेवा पुरस्काने महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. या प्रसंगी महेश इंगळे बोलत होते. प्रारंभी मंदीर समितीच्या वतीने इंदापूर तालुक्यातील पुरस्कार प्राप्त स्वामी भक्तांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून महेश इंगळे यांनी यथोचित सन्मान केला. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा संघाच्या वतीने महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचाही हनुमंत काळे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना हनुमंत काळे सर यांनी इंदापूर तालुक्यातील
निमगाव केतकी, कौठळी, निमसाखर,
दगडवाडी, व्याहळी, शिरसटवाडी,तरंगवाडी,
कळंब, निरवांगी, सराफवाडी, बावडा,
काळेवाडी नंबर एक, शेळगाव, काळेवाडी नंबर दोन, रेडा, खोरोची, रेडणी,बोराटवाडी,
चाकाटी, पिठेवाडी, निरनिमगाव, लाखेवाडी,
काटी, वरकुटे खुर्द, साखरे वस्ती, खोरोची,
घोरपडवाडी, मानेवस्ती, निरवांगी,भगतवाडी,
पिटकेश्वर, शहाजी नगर, बोरी, पोंदकुलवाडी, डाळज नंबर एक, सराटी, जाधववाडी काठी, पंधारवाडी इत्यादी गावांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची नियमीत आरती व दर गुरूवारी नामजपाचा संकल्प कार्यान्वित आहे. या सेवेने प्रेरित होवून इंदापूर तालुका श्री स्वामी समर्थ सेवा संघाच्या वतीने तालुक्यातील स्वामी सेवेकऱ्यांना समर्थ सेवा पुरस्कार प्रदान करण्याचा निश्चय केला.
आमच्या या दृढ निश्चयाची व आमच्या स्वामी सेवेची दखल घेवून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी वटवृक्ष मंदीरात त्यांच्याच हस्ते पुरस्कार वितरण सोहळ्यास संमती दिली.
त्या अनुशंगाने १७ गावातील स्वामी भक्तांना आज येथे समर्थ सेवा पुरस्काने महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले आहे.
पुढे जाऊन एकूण ६५ स्वामी सेवेकरी यांना समर्थ सेवा पुरस्कार प्रदान करण्याचे नियोजन आहे. इंदापूर तालुक्यामध्ये एकूण ३६ गावापैकी बारा गावांमध्ये दर पौर्णिमेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचा सोहळा साजरा केला जातो. त्याच प्रमाणे अन्नदान केले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सव इंदापूर तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये साजरा केला जातो. तालुक्यातील संपूर्ण गावातून १५ ऑगस्टला श्री स्वामी सारामृत या ग्रंथाचं पारायण सोहळा आयोजित केला जातो. इंदापूर तालुका श्री स्वामी समर्थ सेवा संघाने चालू वर्षी निमगाव केतकी ते अक्कलकोट पायी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्यासाठी लागणारा रथ संघाने विकत घेतलेला आहे. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सेवा संघाची वाटचाल सुरू आहे. यामागे वटवृक्ष संस्थानचे अध्यक्ष माननीय महेशराव इंगळे यांचे अत्यंत सहकार्य असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानेच इथून पुढेही वाटचाल सुरू राहील असे मनोगत हनुमंत काळे सर यांनी व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, विद्याधर गुरव सर, प्रसाद पाटील, खाजप्पा झंपले, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, दर्शन घाटगे, विपूल जाधव, सागर गोंडाळ, रविराव महिंद्रकर आदींसह भाविक भक्त इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री स्वामी समर्थ सेवा संघाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील स्वामी सेवेकऱ्यांना समर्थ सेवा पुरस्कार प्रदान करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, हनुमंत काळे सर व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button