गावगाथाठळक बातम्या
PCMC : संततधार पावसामुळे चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली… प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा…
प्रतिनिधी : दयानंद गौडगांव

चिंचवड (प्रतिनिधी): गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची संतधार सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून १५००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरातील अनेक भागात नदीपात्र लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. सुमारे एक हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पवना नदीतील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

थेरगाव येथील केजूबाई बंधारा तुडूंब भरून वाहू लागला आहे. तसेच पुनावळे येथील बंधाराही ओसांडून वाहत आहे. त्यामुळे चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदीर पाण्यात गेले आहे. कालपासून संततधार सुरू असल्यामुळे पाणी शिरले असून परिसरातील नागरिक हे पाणी पाहण्यासाठी गर्दी देखील पहायला मिळत आहे.
