वटवृक्ष मंदीर समितीची पारंपारिक कार्यपध्दती लक्षवेधक – मराठी भाषा मंत्री उदय सामंत
(श्रीशैल गवंडी, अ.कोट दि.२८/११/२५) – गेल्या अनेक वर्षांपासून स्वामींच्या दर्शनाकरिता स्वामीभक्त या नात्याने मी अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात येत असतो. येथील दर्शन व्यवस्था अत्यंत उत्तम आहे. आजच्या व्यवहारीक जगात सर्व भाविकांना मोफत स्वामी दर्शनाची सोय ही मंदिर समितीची जमेची बाजू आहे. मंदीर समितीच्या या व अशा अनेक कार्यातून स्वामी नामाचा प्रचार आता जगभर विस्तारित होत आहे. स्वामींच्या या विस्तारित नाम प्रचारामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची पारंपारिक कार्यपद्धती ही लक्षवेधक ठरत असल्याचे प्रतिपादन शिवसेना शिंदे गट नेते तथा राज्याचे विद्यमान उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या अधिपत्त्याखाली मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे व प्रथमेश इंगळे यांनी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा श्री. स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, महेश साठे, अमर पाटील उपस्थित होते.
फोटो ओळ – उदय सामंत यांचा सत्कार करताना माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
More Stories
रविवारी अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची मेगा सभेचं आयोजन
जि.प .खैराट शाळेत संविधान दिन साजरा
बोरगाव (दे.) येथे श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव उत्साहात साजरा