गावगाथा

अक्कलकोटचे डॉ. धानय्य कौटगीमठ यांचा आणखी एक विक्रम — तब्बल ३०९ विद्यार्थी के-सेट परीक्षेत यशस्वी!

अक्कलकोटचे डॉ. धानय्य कौटगीमठ यांचा आणखी एक विक्रम — तब्बल ३०९ विद्यार्थी के-सेट परीक्षेत यशस्वी!

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : के.एल.ई. मंगरूळे हायस्कूलचे प्रगतशील, अभ्यासू व विद्यार्थ्यांना प्रेरणास्त्रोत ठरलेले डॉ. धानय्य कौटगीमठ यांनी पुन्हा एकदा यशाचा नवा इतिहास रचला आहे. त्यांच्या नि:स्वार्थ, दर्जेदार आणि मोफत ऑनलाइन मार्गदर्शनामुळे कर्नाटक सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (के-सेट) २०२५ मध्ये तब्बल ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा अक्कलकोटच्या शैक्षणिक इतिहासातील अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणामार्फत २ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल अवघ्या १९ दिवसांत जाहीर झाला. युजीसीच्या मान्यतेने आयोजित या परीक्षेत मिळवलेले यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबत डॉ. कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाचे मोठे फलित असल्याचे सर्वत्र गौरविले जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

जागतिक विक्रमाची प्रेरणा

देशभरातील SET, NET, TET या परीक्षा तब्बल ७९ वेळा उत्तीर्ण होण्याचा जागतिक विक्रम डॉ. कौटगीमठ यांच्या नावावर आहे. त्यांच्या सखोल ज्ञान, प्रचंड अनुभव व सोप्या अध्यापन पद्धतीमुळे अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. त्यांनी YouTube मार्गे पूर्णतः मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग यशदायी ठरला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

विविध सामाजिक स्तरातील विद्यार्थ्यांचा यशाचा धडाका

या वर्षीच्या निकालात गोर-गरीब कामगार, शिपाई, सिक्युरिटी गार्ड, पेट्रोल पंप कर्मचारी, महिला, विनाअनुदानित प्राध्यापक, दिव्यांग विद्यार्थी, सैनिक, पोलीस, कोर्ट कर्मचारी, वकील, बस कंडक्टर अशा अनेक समाजघटकांतील उमेदवारांनी सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट, सोलापूर, सांगली, हैदराबाद, केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकातील ३० जिल्ह्यांतील इंग्रजी, कन्नड, कॉमर्स, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आदी विषयांतील विद्यार्थ्यांनी या यशाचा मान मिळवला आहे.

ऑनलाइन मार्गदर्शनाचा प्रभाव

डॉ. कौटगीमठ यांच्या YouTube चॅनेलवर ५२ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले गेले असून १३०० पेक्षा जास्त व्हिडिओ मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यासाची सुविधा प्राप्त झाली आहे.

अक्कलकोट तालुक्यातीलही विद्यार्थ्यांचा यशामध्ये मोठा वाटा

अक्कलकोट तालुक्यातील —
प्रा. अश्विनी वळसंग (वागदरी), प्रा. श्रीशैल चानकोटगी (तोलनूर), प्रा. इकरा पीरजादे पाटील, प्रा. विनायक कलशेट्टी (अक्कलकोट), प्रा. प्रीती विरादे (भंडार कवठा) — या प्राध्यापकांनीही के-सेटमध्ये उत्तीर्ण होत तालुक्याचा मान उंचावला आहे.


विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी अनुभव

प्रा. अरुण, बेंगळुरू (पेट्रोल पंप कर्मचारी)
“दररोज डॉ. डी.के. सरांचे व्हिडिओ पाहून नोट्स घेतल्या. YouTube वरील सविस्तर मार्गदर्शनामुळे मी आत्मविश्वासाने परीक्षा उत्तीर्ण झालो.”

प्रा. रेवण, मैसूर (सिक्युरिटी गार्ड)
“रात्री ड्युटी करताना सरांचे व्हिडिओ पाहत असे. त्या प्रेरणेने चिकाटी वाढली आणि मी के-सेट पास झालो.”

प्रा. ज्योती (दिव्यांग विद्यार्थीनी)
“वडिलांचे निधन, आर्थिक संकट आणि दिव्यांगत्व या सगळ्यात धानय्य सरांचे व्हिडिओ मला आधार देणारे ठरले. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले.”


समाजासाठी चालू ठेवलेली ज्ञानसेवा

आजपर्यंत १३५८ विद्यार्थी डॉ. कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनामुळे SET, NET, TET परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांची ही निरंतर सेवा अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनली असून, अक्कलकोटची शैक्षणिक ओळख राष्ट्रीय पातळीवर झळाळून निघत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button