गावगाथा

ठळक बातम्या

रविवारी अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची मेगा सभेचं आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस  यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
सदरची जाहिर सभा ही  रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. मंगरूळे हायस्कूल शेजारील पटांगण, अक्कलकोट येथे होणार आहे.
आपल्या अक्कलकोट तालुक्याच्या विकासाचा दृढ संकल्प आणि भारतीय जनता पक्षाचे विकासाचे धोरण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने या जाहीर सभेस उपस्थित  राहावे असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे.