मुंबईच्या भक्तांची वटवृक्ष मंदीरात हरवून सापडली सोन्याची अंगठ मंदीर समितीने केली परत.
संबंधीत स्वामी भक्त आर.पी.आय.तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांचे भगिनी
वटवृक्ष मंदीर समितीचे कामकाज पारदर्शक
(श्रीशैल गवंडी, दि.२९/०८/२०२५.अ.कोट)
मुलूंड मुंबई येथील स्वामी भक्त मिनाक्षी कलियन या नुकतेच आपल्या कुटूंबासमवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या दर्शनास आले होते. त्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्या समोरील परिसरात मिनाक्षी कलियन यांच्या हाताच्या बोटातील डायमंड खड्याने मढविलेली साडे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी सैल होवून गळून पडली. स्वामी दर्शनात मग्न असलेल्या स्वामी भक्त मिनाक्षी कलियन यांना ही बाब तात्काळ लक्षात आली नाही. दर्शन घेऊन बाहेर गेल्यानंतर त्यांच्या हाताच्या बोटामध्ये अंगठी नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ देवस्थान कार्यालय गाठून सदर घटनेची माहिती दिली तसेच आपले पुर्ण नावं, पत्ता, व संपर्क क्रमांकाची नोंदणी केली. सायंकाळी मंदीर गाभारा परिसर नियमीतपणे साफसफाई व झाडू काम येथे रोजची हि दिनचर्या सुरु असताना सदरहू अंगठी देवस्थान सेवेकऱ्यांना निदर्शनास आली व ती त्यांनी देवस्थान कार्यालयात जमा केली. यानंतर मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांनी सदरहू अंगठी स्वामी भक्त मिनाक्षी कलियन यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे बंधू व आर.पी.आय.तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी स्वामी भक्त मिनाक्षी कलियन यांनी मंदीर समितीचे आभार मानत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे कामकाज पारदर्शक असल्याचे सांगून मंदीर समितीचे आभार मानले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संतोष पराणे, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, गिरीश पवार आदींसह देवस्थानचे अन्य सेवेकरी उपस्थित होते.
(चौकट – मी स्वामींच्या दर्शनाकरीता येथे आल्यानंतर माझी येथे हरवलेली अंगठी मंदीर समितीने परत केले आहे. मंदीर समितीचे हे कार्य समाधान देणारे व घटना संबंधीत भाविकांच्या हितावह आहे.
मंदीर समितीचे व चेअरमन महेश इंगळे यांचे मनापासून आभार – मिनाक्षी कलियन, स्वामीभक्त, मुलुंड, मुंबई)
फोटो ओळ – स्वामी भक्त मिनाक्षी कलियन यांची देवस्थान परिसरात हरवलेली अंगठी सापडल्यानंतर अविनाश मडीखांबे यांच्याकडे सुपूर्द करताना महेश इंगळे,
समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संतोष पराणे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!