वळसंग पोलिसांची मोठी कारवाई — तिल्ल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारूवर छापा
सोलापूर (दि. २९ ऑक्टोबर २०२५):
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत मौजे तिल्ल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे.
ही कारवाई श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग श्री. विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रविराज कांबळे, तसेच पोलीस हवालदार श्री. श्रीशैल माळी, सुनील कुवर, अशोक पाटील, दर्याप्पा व्हाणमोरी आणि संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला.
छाप्यात एकूण १,४०० लिटर गुळमिश्रित रसायन आणि बॅरलसह ₹५०,४०० किमतीचा मुद्देमाल, तसेच ७० लिटर तयार हातभट्टी दारू (किंमत अंदाजे ₹७,०००) जप्त करण्यात आली.
या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!