विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमासोबत संशोधनात गोडी निर्माण करावी
संगमेश्वरच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पार्वती धत्तरगी प्रथम

विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमासोबत संशोधनात गोडी निर्माण करावी
डॉ. सुनील विभुते
संगमेश्वरच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पार्वती धत्तरगी प्रथम
सोलापूर ( दिनांक २२ ) ” विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमासोबत संशोधनात गोडी निर्माण करावी त्यातून विज्ञान क्षेत्रात उत्तम करिअर घडण्यास मदत होते. विज्ञान शिक्षकांनी संशोधन क्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांना द्यावेत.” असे प्रतिपादन बार्शीचे विज्ञान लेखक सुनील विभुते यांनी केले. ते विज्ञान केंद्र आणि संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग आयोजित जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्र. डॉ.राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, परीक्षक संगीता सातवेकर ,सुनिता कुलकर्णी उपस्थित होते.
विज्ञान विश्वकल्याणासाठी हे ब्रीद घेऊन विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. यामध्ये १०० प्रयोगांचे संच यामध्ये सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य यांनी केले. नागेश कोल्हे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी जगभरातील वैज्ञानिक शोध आणि शास्त्रज्ञांचे किस्से सांगत विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत उद्बोधन केले.प्रियंका पाटील यांनी निकाल जाहीर केले.प्रत्येकी रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
निकाल याप्रमाणे- प्रथम क्रमांक – पार्वती धत्तरगी (संगमेश्वर कॉलेज रुपये ३००१) द्वितीय क्रमांक – देव देसाई, अभिषेक माळगे ( संगमेश्वर कॉलेज, रुपये २००१ ) तृतीय क्रमांक- मयूर निलंगे, साक्षी जावळे ( गांधींनाथा रंगजी महाविद्यालय, रुपये १००१ ) उत्तेजनार्थ – शंकर बिरजनवार, विजयालक्ष्मी दीक्षित, प्रणव कांबळे, समर्थ तळणीकर, मंथन कांबळे, समृद्धी वाकसे, आरुष बंगारी, श्रुतिका साखरे, गायत्री गंधारे ( ह. दे. कनिष्ठ महाविद्यालय ) सिद्धी जोडभावी, गायत्री गांगर ,साक्षी करजगीकर, नागेश्वरी रुपनर, नीलंबिका साबणे, समर्थ अक्कलकोटे, रितेश गुंड, चंद्रशेखर रामपुरे, स्वप्निल बसर्गी.
याप्रसंगी विज्ञान शाखेतील रामराव राठोड, चंद्रकांत हिरतोट, बाळकृष्ण कापसे,शुभदा कुलकर्णी , प्रशांत शिंपी, विज्ञान प्रदर्शन समन्वयक विश्वजीत आहेरकर , रोहन डोंगरे, स्मिता शिंदे, प्रशांत पाटील, सिद्धाराम विजापुरे, प्राजक्ता चव्हाण, सुषमा पाटील, तुकाराम साळुंखे, अभिजीत निवर्गीकर, विशाल जत्ती, संगमेश्वर स्वामी, शंकर शितल, स्नेहल खैरे, अश्विनी वाघमारे, मानसी काळे, शिल्पा लब्बा, बार्शीहून निशिगंध झाडबुके, सुनील लुंगारे ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन लीना खमितकर यांनी केले तर आभार रूपाली अंबुलगे यांनी मानले.
फोटो ओळी- संगमेश्वरच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पार्वती धत्तरगी प्रथम आली. बक्षीस वितरणप्रसंगी विजेते विद्यार्थी आणि प्रमुख पाहुणे बार्शीचे विज्ञान लेखक डॉ. सुनील विभुते , प्र.प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, परीक्षक संगीता सातवेकर ,सुनिता कुलकर्णी.
