अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात, संघटीत राहणे गरजेचे — गायकवाड

द.सोलापुर,ता:०७ गेल्या काही वर्षापासून नागरिकांचे अभिव्यक्ती स्वतंत्र धोक्यात आले असून असंघटित लोकांनी संघटित राहण्याची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य अँड संजय गायकवाड यांनी केले. २४ एप्रिल १९३७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील विहीरीचे पिण्याच्या पाण्याचे पूजन करून नागरिकांसाठी विहीर खुली केली होती.
त्या ऐतिहासिक विहिरीवर ०६ डिसेंबर व १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक येतात. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात अँड. गायकवाड , पत्रकार दिनकर नारायणकर व पत्रकार अल्ताफ पटेल यांच्यासह सर्वच वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्राचा वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले . सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे,माजी सरपंच सिध्दाराम कोडले,प्रा. महादेव होटकर,ग्रामपंचायत सदस्य मलकप्पा कोडले,श्रीशैल भुसणगी,शालम अमलिचुंगे,श्रावण पुटके, विनोद सुरपुरे,माजी उपसरपंच आरीफ कुरेशी ,सुतमील संचालक लक्ष्मण हंजगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दाऊद अमलिचुंगे, सिद्धाराम वाघमारे, संतोष गायकवाड, कुमार होटकर ,उमाकांत गायकवाड,शांतकुमार गायकवाड,खंडू वाघमारे,अक्षय गायकवाड,श्रीशैल गायकवाड ,महिला ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी गायकवाड, कमळाबाई गायकवाड, वैशाली गायकवाड, सुरेखा गायकवाड, आशा वर्कर अनिता जंगलबाग यांच्यासह गावातील व परिसरातील नागरिकांनी ऐतिहासिक विहिरी स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन केले.
संध्याकाळी ऐतिहासिक विहीर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!