*भर पावसातही शुभंकरोति साहित्य परिवारचा एक दिवसीय कार्यक्रम थाटामाटात संपन्न*
साहित्य यज्ञ हेच आमचे ध्येय असलेल्या शुभंकरोति साहित्य परिवारतर्फे रविवार दि.१७ ऑगस्ट २०२५ रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र मुंबई येथे राज्यस्तरीय गझल कार्यशाळा, शुभंकरोति गुणगौरव पुरस्कार, पुस्तक प्रकाशन आणि गझल मुशायरा आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाध्यक्षपद मा. हेमंत सुधाकर सामंत यांनी भूषवले होते तर मा. नीलकंठ श्रीखंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे महायोजक मा. श्री. राजीव श्रीखंडे, प्रमुख मान्यवर मा. श्री. गुलराज सिंग (ढगे), गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष मा. आप्पा ठाकूर तसेच संस्थेच्या संस्थापिका मा. सौ. सोनाली जगताप, प्रशासक मा. जयंत शिगवण, मा. किरण वेताळ, मा. अंकिता गायकवाड इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने आणि त्यानंतर मा. सौ. सोनाली जगताप यांच्या ईशस्तवनाने झाली.
त्यानंतर संमेलन अध्यक्ष श्री. हेमंत सुधाकर सामंत यांची सौ. सोनाली जगताप व श्री. सुहास जगताप यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मा. स्वाती पोळ यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सर्व मान्यवरांनाही शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारानंतर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतरच्या गझल मुशायरा या सत्रात मा. किरण वेताळ यांनी मा. श्री ए. के. शेख सरांनी जुलै महिन्यात घेतलेल्या गझल कार्यशाळेचा आढावा घेतला.
या कार्यशाळेत सहभाग घेतलेले मा. शिल्पा चऱ्हाटे, मा. सोनाली जगताप, मा. गौरी पंडित, मा. दिपाली घाडगे, मा. अंकिता गायकवाड यांनी आपली स्वलिखित गझल सादर केली. मा. राधिका भांडारकर यांनी मा. अरुणा मुल्हेरकर यांची गझल सादर केली तर मा. सुनील पारेख यांनी गुजराती गझल सादर केली.
या क्षेत्राचे सूत्रसंचालन मा. दिपाली घाडगे यांनी केले. त्याचवेळी सुप्रसिद्ध कवयित्री मा. रेश्मा कारखानीस यांचे अवचित आगमन झाले. त्यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले व एक सुंदर गझल सादर केली.
मा. जीतू आर म्हात्रे यांनी पण एक सुंदर गझल सादर केली
त्यानंतर मा. सुहास जगताप व मान्यवर सुप्रसिद्ध संगीतकार गुलराज सिंग (ढगे) आणि गझल गायक आदित्य कडतने या तिन युवकांनी आपल्या सुमधुर आवाजात गझला गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
पुढील सत्रात मा. शिल्पा चऱ्हाटे यांचे “भेट तुझी माझी” आणि ऋचा पारेख यांचे “आत्मायन” या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतरच्या सत्रात मा. हेमांगी नेरकर, मा. प्रकाश राणे, मा. विसुभाऊ बापट, मा. निखिल कोलते, मा. वैभव धनावडे, मा. प्रमोद सूर्यवंशी, मा. सुनील पारेख, मा. आदित्य कडतने, मा. जयंत शिगवण, मा. डॉक्टर अलका नाईक, मा. विजय जोशी (विजो), मा. किरण वेताळ, मा. सुरेश पवार, मा. मनोज वराडे, मा. राजीव श्रीखंडे, मा. अस्मिता चौधरी, मा. सदानंद डबीर, मा. रुपेश मुरुडकर, मा. जितू म्हात्रे, मा. पल्लवी सरमरकर, मा. भक्ती भोसले यांना मान्यवरांच्या हस्ते *शुभंकरोति गुणगौरव पुरस्कार* प्रदान करून गौरवण्यात आले.
या सत्राचे अतिशय उत्कृष्ट असे सूत्रसंचालन मा. जितू म्हात्रे, मा. शिल्पा चऱ्हाटे, मा. स्वाती पोळ आणि मा. दिपाली घाडगे यांनी केले.
कोकण विभाग पत्रकार संघातर्फे मा. सौ. सोनाली जगताप यांना मा. पत्रकार रवींद्र यशवंतराव (देशमुख) यांच्या हस्ते तसेच मा. मनोज वराडे, डॉक्टर सुभाष कटकदौंड, मा. डॉक्टर अलका नाईक यांच्या हस्ते *साहित्य सरिता पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर मा. हेमंत सुधाकर सामंत सरांचे अध्यक्षीय भाषण अतिशय प्रबोधन देणारे होते.
पुढील सत्रात मा. गझलकार आप्पा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा रंगला. यात मा. कल्पना गवरे, मा. नंदू सावंत, मा. रवींद्र यशवंतराव (देशमुख), मा. मनोज वराडे, मा. प्रतिभा सराफ, मा. सौ. स्मिता हर्डीकर, मा. राधिका भांडारकर, मा. डॉक्टर सुभाष कटकदौंड, मा. कमलाकर राऊत, मा. निशा वर्तक, मा. मानसी म्हसकर, मा. किरण वेताळ या निमंत्रित गझलकारांनी आपल्या बहारदार गजला सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. याचे सूत्रसंचालन मा. किरण वेताळ यांनी केले.
मा. आप्पा ठाकूर यांची प्रत्येक गझल मनाला भुरळ घालत होती. त्यांची सुप्रसिद्ध गझल करार बाकी आहे आणि विठ्ठलाची गझल ऐकून प्रेक्षक भारावून गेले.
सर्व दिगजांच्या आगमनाने सारे वातावरण भारावून गेले होते.
मा. अंकिता गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केल्यावर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!