गावगाथा

अक्कलकोट येथे श्री संत सेना महाराज यांची ६५६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

दिन विशेष

अक्कलकोट येथे श्री संत सेना महाराज यांची ६५६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी
अक्कलकोट ( प्रतिनिधी )श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुउददेशिय संस्था (रजि) अक्कलकोट शहर संचलित
श्री संत सेना महाराज पुण्यतिथी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. संत सेना महाराजांच्या मुर्तीला आभिषेक करून विणा पुजन करण्यात आला.
१९ ऑगस्ट रोजी सकाळी आभिषेक व गोरज मुहुर्तावर समर्थ विभूते व लखन
चिखले या नवदाम्पत्यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता सेना महाराजांच्या मुर्तीचे पुजन करण्यात
आले. त्यानंतर जयभवानी भजनी मंडळ बावकरवाडी यांचा भजन, भारूड व जागार कार्यक्रम पार पडला.
दिनांक २० ऑगस्ट वार बुधवार रोजी सकाळी स्वामी समर्थ भजनी मंडळ समर्थ नगर
अक्कलकोट यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. सकाळी १० वाजता आपल्या अक्कलकोट तालुक्याचे
. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभ हस्ते भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन झाले. त्यांचा सत्कार श्री संतसेना महाराज नाभिक समाज बहुउददेशीय संस्था
अक्कलकोटचे चेअरमन . सुदर्शन विभूते यांनी केले. संध्याकाळ पर्यंत १६७ जणांनी रक्तदान
केले.
दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांनी स्वामी समर्थ मंदिराचे चेअरमन महेश इंगळे
यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पार पडले. त्यांचा सत्कार अक्कलकोट शहर नाभिक समाज अध्यक्ष . लक्ष्मण विभूते यांनी केले.
प्रमुख उपस्थिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष . अमोलराजे जन्मेजयराजे भोसले
यांचे चिरंजीव . हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले उपस्थित होते. त्यांचा सत्कार शहर अध्यक्ष
लक्ष्मण विभूते यांनी केले. अक्कलकोट माजी उपनगराध्यक्ष . येशवंत धोंगडे
यांचा सत्कार तालुका अध्यक्ष . शिवशरण सुरवसे यांनी केले. त्याचप्रमाणे भाजपा अल्पसंख्यांक
सेलचे सोलापुर जिल्हा अध्यक्ष . नन्नू कोरबू यांचा सत्कार श्री. संतसेना महाराज नाभिक
समाज बहुउददेशिय संस्थेचे उपाध्यक्ष भागवत विभूते यांनी केले. माजी नगरसेविका
ज्योति जरीपटके यांचा सत्कार महिला अध्यक्ष. प्रमिला वाघमारे यांनी केले. त्याचप्रमाणे
माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे, विक्रम बाळा शिंदे,. खुशाल वाळुंजकर,
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष . शिवाजी जमदाडे, बंटी राठोड, इरफान कोरबू,
दिपक जरीपटके, फकीरा दलाचे अध्यक्ष . जोतीबा पारखे, मंडप कॉन्ट्रयक्टर रमेश सोडगी,
योगेश पवार, पत्रकार शिवानंद फुलारी या मान्यवरांचे श्री संतसेना महाराज नाभिक समाज
बहुउददेशिय संस्थेतील संस्थापक अध्यक्ष सुदर्शन विभुते, उपाध्यक्ष भागवत विभूते,
सचिव प्रभाकर सुरवसे, सहसचिव महेश घाटे, सोमनिंग सुरवसे, महेश सुरवसे,
पद्माकर डिगे संचालक सुधिर वाळके, संचालक सुमित डिगे, शहर उपाध्यक्ष राजेश कोरे,
खजिनदार प्रविण राऊत यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
तसेच नाभिक समाजाचे तालुका युवक अध्यक्ष श्रीशैल सुरवसे, व्यंकट विभूते, श्री राजेंद्र
सुरवसे, अमोल सुरवसे, प्रशांत विभूते, दादा वाळके, आजिनात वाळके, अनिल वाघमारे, महादेव
भाले, किरण भाले, शिवराज कोरे, युवराज कोरे, नरसिंग क्षिरसागर, अविनाश क्षिरसागर, काशिनाथ
विभूते सोनल सुरवसे, वैशाख डिग्गे, अमर सुरवसे, श्रीकांत विभूते, संदीप राऊत, संकेत विभूते,
प्रकाश सुरवसे, शिवा विभूते, सचिन विभूते, हरि राऊत, माजी तालुका व शहर अध्यक्ष अरूण
विभूते, महिला उपाध्यक्षा भुवनेश्वरी विभूते, सचिव. कविता विभूते, खजिनदार . शैलजा भाले,
सुधिर सुरवसे अनिल कोरे, सुनिल कोरे, निरंजन क्षिरसागर, रघुनाथ क्षिरसागर सर्व नाभिक
समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन . सुभाष सुरवसे यांनी केले. तर आभार
तालुका अध्यक्ष शिवशरण सुरवसे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button