संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ‘आनंदडोही’ नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध
अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी) : विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पगुंठ्यात ‘आनंदडोही’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे प्रभावी सादरीकरण योगेश सोमण यांनी केले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित या नाट्यातून संतांचे विचार, कवित्व आणि अध्यात्मिक जीवनदृष्टी रसिकांसमोर प्रभावीपणे उलगडली.
दीपप्रज्वलन व गणेश प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी कलावंत योगेश सोमण, प्रशांत शिंपी, प्रताप भोसले, सुरेश पाटील व खंडेराव घाटगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. योगेश सोमण यांचा सत्कार डॉ. बसवराज चिणकेकर यांच्या शुभहस्ते झाला.
नाट्य सादरीकरणात सोमण म्हणाले, “संत तुकाराम महाराज हे संतश्रेष्ठ, बंडखोरातील बंडखोर, क्रांतिकारकांचे क्रांतिकारक आणि भक्तांतील परमभक्त होते. त्यांच्या इंद्रायणीच्या डोहातील गाथा आणि आत्मसंवाद हाच ‘आनंदडोही’चा गाभा आहे.”
या प्रसंगी प्रवीण शहा, शिवानंद वाले, अशोक पोतदार, गुरुपाद आळगी, मल्लिनाथ मसुती, विलास कोरे, अप्पा हलगुनकी, महेश कापसे, आप्पासाहेब पाटील यांच्यासह शेकडो श्रोते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिगंधा कोळी यांनी केले. बापूजी निंबाळकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली तर आभार चंद्रकांत दसले यांनी मानले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!