भाविकांच्या सोयी सुविधांना व भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे प्राधान्य
स्वामी दर्शनानंतर प्रभारी तहसीलदार शिल्पा पाटील यांचे मनोगत
(अ.कोट, दिनांक – ०४/०९/२०२५)
येथील श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य हे सेवाभावी वृत्तीने व समर्पित कार्याने चालते, म्हणून भाविकांच्या सोई सुविधांना व भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे नेहमी प्राधान्य असल्याचे मनोगत अक्कलकोटचे प्रभारी तहसीलदार शिल्पा पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रभारी तहसीलदार शिल्पा पाटील यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी तहसीलदार शिल्पा पाटील बोलत होते. पुढे बोलताना
प्रभारी तहसीलदार शिल्पा पाटील यांनी
मी पण स्वामी समर्थाची भक्त आहे यामुळे मंदीरात स्वामी भक्तांच्या घडामोडीकडे समाज माध्यमातून नेहमी लक्ष असते.
स्वामी समर्थांच्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर समिती अहोरात्र भाविकांच्या सेवेस तत्पर आहे. गर्दीचे स्वरूप पाहून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या मर्यादित परिसरातही वारंवार विविध प्रकारचे नियोजन असतात, त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे नियोजनबद्ध स्वामी दर्शन हे सुलभतेने पार पडत आहे. अशी सेवा पाहून स्वामी सेवेप्रती असलेलं मंदिर समितीचं कार्य आदर्शवत असल्याचे मनोगतही प्रभारी तहसीलदार शिल्पा पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे,
नायब तहसीलदार अजित गायकवाड कर्मचारी कुंभार, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, शिवशरण अचलेर, अमर पाटील, खाजप्पा झंपले, विपूल जाधव, संतोष जमगे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – प्रभारी तहसीलदार शिल्पा पाटील यांचा सत्कार करताना महेश इंगळे,
दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!