स्पर्धा परीक्षेसाठी कठोर परिश्रम घ्या
यश निश्चित मिळेल : मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ
अक्कलकोट :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा कठीण वाटते,परंतु त्यांनी कठोर परिश्रम करून जिद्द व चिकाटीने परीक्षा दिली तर यश हमखास मिळते याचा अनुभव बहुसंख्य परीक्षार्थींना आला आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालया तील पंचप्पा कल्याणशेट्टी कौशल्य विकास केंद्रांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुनम कोकळगी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भ ग्रंथाचे वाचन केले पाहिजे, संस्कृती, कला, क्रीडा व चालू घडामोडी आदीसाठी दैनंदिन वर्तमानपत्रे वाचावी लागतात, त्यातील संदर्भ अधोरेखित करावे लागतात, त्यामुळे ज्ञानाचे संवर्धन होते, लेखनशैली प्रभावी होते, त्यामुळे यशाचा मार्ग खुला होतो.
पुनम कोकळगी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी चौफेर अभ्यास केला पाहिजे संदर्भ ग्रंथांचे वाचन, मनन व चिंतन करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला पाहिजे त्यामुळे यश आणखीनच जवळ येते.
प्रारंभी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी केले तर आभार प्रा सौरभ भस्मे यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी देखील आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!