स्त्रीशक्तीचा सन्मान आयुष्यभर करावा – सौ. सुनीता बंदीछोडे यांचे प्रतिपादन
नागणसुर :
स्त्रियांचा सन्मान करणे फक्त नवरात्रीपुरते मर्यादित न राहता आयुष्यभर स्त्रीशक्तीचा आदर, मान-सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन एच.जी. प्रचंडे नागणसुर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुनीता बंदीछोडे यांनी केले.
भारतीय संस्कृतीची नवीन पिढीला ओळख व्हावी या हेतूने प्रशालेत ‘आदिशक्तीचा जागर’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात कु. अपेक्षा धानशेट्टी हिने देशभरात नवरात्रीचे उत्सव कशाप्रकारे साजरे होतात याची माहिती दिली. कु. सपना लोणार हिने तुळजापूर अंबाबाई या साडेतीन शक्तीपीठांपैकी एकाचे महात्म्य आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
यावेळी कु. सुशांता जेजुरे, दिव्या शिंदे, धनश्री गाजरे, साक्षी काजळे, सान्वी शिंदे व मोनिका पांढरे यांनी देवीची गीते सादर केली. कु. आयेशा पटेल व उर्वी मेणसे यांनी देवीचे विविध अवतार रांगोळीतून साकारले.
प्रशालेचे ज्येष्ठ लिपिक श्री. थावरू चव्हाण यांनी आपल्या खास काव्यात्मक शैलीत विद्यार्थ्यांना नवरात्रीचे महत्त्व, देवीचे नऊ रूपे, उपवासाचे महत्त्व, साड्यांचे रंग आणि महिलांच्या सन्मानाविषयी माहिती दिली.
या प्रसंगी व्यासपीठावर मा. प्राचार्य शंकर व्हनमाने, सौ. बेबी प्रचंडे, सौ. वृषाली जगताप, सौ. प्रमिला शिवगुंडे, सौ. जयश्री करोटे व कु. जयश्री प्रचंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सोमशेखर कळसगोंडा, अजय पाटील, आकाश कोनापुरे, नितीन धानशेट्टी, विश्वनाथ तळवार, माणिक किणगी, सागर पोतदार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री. विश्वनाथ वाघमोडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. संजय गंगदे यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!