श्री शारदा समाजसेवा मंडळ, मुंबई वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न !
चिपळूण (विश्वनाथ पंडित) तुरंबव गावच्या ग्रामस्थांची एक पारंपारिक खासियत आहे तेथे देणाऱ्यांचे हात खूप आहेत मात्र घेणारे कमी पडतात की काय अशी भीती वाटते असे प्रतिपादन ग्रामीण विकास हाच ज्यांचा ध्यास असे युवा समाजसेवक, माजी सरपंच सुनील शेठ जाधव यांनी व्यक्त केले. शारदा समाज सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक व अन्य क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शन भाषणात ते पुढे म्हणाले गावचा, गावच्या माणसांच्या विकासासाठी आम्हीं कटिबद्ध असून सर्व सोयीसुविधा युक्त असा एक टूमदार आपला गाव करावयाचे स्वप्न आम्हीं बाळगून आहोत यासाठी सर्वांनी सहकार्याच्या भुमिकेतून एकत्रितपणे राहणे फार महत्त्वाचे आहे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पंडित यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व क्रीडा कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करून त्यासाठी शिक्षक वर्ग पोट तिडकिने अथक परिश्रम करीत असल्याचे जाणवले ते पुढे म्हणाले शिक्षणासाठी लागणारी सारी मदत सहकार्य करण्यास मुंबई मंडळ सदैव तत्पर असून केव्हांही हाक मारा साद जरूर मिळेल असे आश्वासित केले. विद्यार्थी गुणगौरवार्थ त्यांना पारितोषिके देऊन तर बागेश्री पंडित यांनी क्रीडा साहित्य देऊन मुलांचे कौतुक केले. शारदा ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पंडित, उपाध्यक्ष विकास पंडित यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, मुंबई, स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि महिलांची समारंभाला लक्षणीय उपस्थिती लाभली होती.
विश्वनाथ पंडित
९५८८४५०४४२
Back to top button
×
No WhatsApp Number Found!