मंद्रुपच्या नौशाद काझीचे MPSC वर्ग एकच्या परीक्षेत घवघवीत यश
मंद्रुपसह परिसरातील गावात अजूनही बऱ्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. यात शिक्षणाची कास धरून अधिकारी होणे, ही फार मोठी गोष्ट आहे. हेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील नौशाद शहाजहान काझी यानी करून दाखवले आहे.
ते मंद्रुप गावातील पहिले MPSC उत्तीर्ण झाले असून हे अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
नौशाद यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण मंद्रुपच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण महात्मा फुले माध्यमिक विद्यालय या ठिकाणी घेऊन नंतर सोलापूरच्या पानगल विद्यालयात कॉलेजचे शिक्षण व औरंगाबाद येथून गव्हर्नमेंट कॉलेजमधून B.Tech ची डिग्री पूर्ण केले.
नंतर NIT गोवा येथून M.Tech ही पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना सातारा नगरपरिषद येथे विद्दुत अभियंता तसेच मुंबई मेट्रो मध्ये स्टेशन कंट्रोलरची तसेच ट्राफिक कंट्रोलर ची नोकरी मिळाली. सध्या ते मंत्रालय मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सुरू असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. २०२४ मध्ये एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला व परिक्षेत चांगले गुण मिळवत एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत मुस्लिम समाजात महाराष्ट्रात पहिला क्रमांक तर EWS मध्ये महाराष्ट्रात राज्यातून आठवा क्रमांक मिळवला.
नौशादला त्याचे वडील शहाजहान काझी, स्व. देशपांडे सर , स्व.विजापूरे गुरूजी, बगले गुरूजी, कमळे मॅडम, शिवशंकर राऊत सर, मुन्ना शेख सर, परीक्षाळे सर यांचे मार्गदर्शन तर त्याच्या कुटुंबीयांची मोलाची साथ मिळाली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!