गावगाथाठळक बातम्या

Sikander Shaikh arrested | महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अटक ; काय आहे प्रकरण ? वाचा सविस्तर

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील कुख्यात टोळीशी सिकंदर शेखचे संबंध असल्याचं उघड झालं आहे, त्यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सिकंदर हा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक केली आहे. तपासामध्ये राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदर शेख याचे संबंध असल्याचं उघड झालं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सिकंदर शेख हा कोल्हापुरातील गंगावेश तालमीत सराव केलेला नामांकित कुस्तीपटू आहे. तसंच तो महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे. सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, ज्यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सिकंदर शेखचा समावेश आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button