गावगाथा

ठळक बातम्या

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा सत्कार न्यासाच्या वतीने कोल्हापूर येथे संपन्न झाला.

या भेटी प्रसंगी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र आणि पुष्पगुच्छ अर्पण करून सुनिल फुलारी यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, पालखी संयोजक संतोष भोसले, मधुकर सुरवसे, शिवराज स्वामी, सायबन्ना जाधव, महांतेश स्वामी व संतोष माने उपस्थित होते.