गावगाथा

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार; अभिष्ठचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

वाढदिवस विशेष

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार; अभिष्ठचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाच्या वतीने अभिष्ठचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी न्यासाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र आणि पुष्पहार अर्पण करून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सन्मान करण्यात आला. सदरचा सत्कार सोहळा हन्नूर रस्त्यावरील कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात पार पडला.

या वेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अरविंद शिंदे, शिवराज स्वामी, सौरभ मोरे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, संजय गोंडाळ, अतिश पवार, विशाल कलबुर्गी, राहूल इंडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button