गावगाथा

बालदिनी साजरा होणार ‘बालकुमार’चा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ

बाल साहित्यिकांचा सन्मान; मुलांसह शाळांना ग्रंथभेट

बालदिनी साजरा होणार ‘बालकुमार’चा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ

विविध उपक्रमांनी साजरा होणार ‘बालकुमार’चा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ

बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन; बाल साहित्यिकांचा सन्मान; मुलांसह शाळांना ग्रंथभेट…

पुणे : मुलांमध्ये वाचन संस्कार रूजविण्यासाठी गेल्या 50 वर्षांपासून कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या बाल साहित्यातील मातृ संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. प्रख्यात व प्रसिद्ध बाल साहित्यिकांनी उलगडलेल्या बाल साहित्याच्या सुवर्णपटाचा आढावा असलेल्या ‘बालकुमार सुवर्णगाथा’ या स्मरणिकेच्या प्रकाशनासह आजपर्यंत साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या बाल साहित्यिकांचा गौरव तसेच बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुलांसाठी काम करणारी संस्था या नात्याने सुवर्णंमहोत्सवी वर्षे सांगता समारंभासाठी संस्थेने खास बालदिनाचा योग साधला आहे.

हा सोहळा शुक्रवार, दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी (बालदिन) सकाळी 10 वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे हे असणार आहेत. बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते केले जाणार आहे, तर साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांचा सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह प्रसाद भडसावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू व कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने केली जाणार आहे. हे गीत शालेय विद्यार्थी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या 100 मुला-मुलींना बाल साहित्याची पुस्तके भेट दिली जाणार आहेत.
दिलीप प्रभावळकर, बाबा भांड, माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, ल. म. कडू, सलीम सरदार मुल्ला, आबा महाजन, संजय वाघ, डॉ. संगीता बर्वे, एकनाथ आव्हाड, भारत सासणे आणि डॉ. सुरेश सावंत या साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच आत्तापर्यंत झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजीव तांबे, डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे, डॉ. न. म. जोशी, सूर्यकांत सराफ, गोविंद गोडबोले, मदन हजेरी यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
मुलांना वाचणाची गोडी लागण्यासाठी माध्यमिक आश्रमशाळा सु-डोंगरगाव ता. जळकोट जि. लातूर, विद्या विकास मंदिर अंदगाव, ता. मुळशी जि. पुणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगळंबे ता. हवेली, जि. पुणे, हुतात्मा राजगुरू प्रसारक मंडळ, राजगुरूनगर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरी ता. मुळशी जि. पुणे या 5 शाळांना प्रत्येकी 50 बाल साहित्याच्या पुस्तकांचा संच संस्थेतर्फे भेट दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी वाचक, बालकांसाठी लेखन करणारे लेखक, प्रकाशक, चित्रकार, शिक्षक, पालकांनी उपस्थित रहावे, असे आव्हान माधव राजगुरू व अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button