गावगाथा

विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करावे : प्रा डॉ आयशा रंग्रेझ

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल कक्ष आयोजित कार्यक्रम

विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करावे : प्रा डॉ आयशा रंग्रेझ

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल कक्ष आयोजित कार्यक्रम

अक्कलकोट :

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करावे असे मत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या प्रा डॉ आयेशा रंग्रेझ यांनी व्यक्त केल्या.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा डॉ मनोज कसबे, प्रा.डॉ अमोल शिंदे, प्रा डॉ विठ्ठल वाघमारे, मुख्याध्यापक मलकप्‍पा भरमशेट्टी उपस्थित होते.

पुढे त्या म्हणाल्या की, प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात लोकसंख्येच्या प्रमाणात कौशल्य प्राप्त कारागिर खूपच कमी आहेत त्यामुळे महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षण मिळाले तर त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराची संधी मिळणार आहे, म्हणून महाविद्यालय व्यवस्थापन परिषदेने कौशल्य विकासाची केंद्रे सुरू करावीत.

मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यवस्थापन परिषद कटिबद्ध असते, महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे गरजेचे आहे हे आम्हास मान्य आहे, परंतु त्यासाठी विद्यापीठाने देखील शासकीय योजना अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयापर्यंत पोचविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस आर लोखंडे यांनी केले आभार प्रा मनीषा शिंदे यांनी मानले कार्यक्रमास प्रा हर्षदा गायकवाड,प्रा प्राची गणाचारी उपस्थित होते.

चौकटीतील मजकूर

विद्यार्थिनींना कौशल्याभिमुख शिक्षण द्यावे

विद्यार्थ्याबरोबर विद्यार्थिनींना देखील स्वावलंबी होण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन, फूड प्रोसेसिंग, ड्रायव्हिंग, प्लंबिंग, टायपिंग आदी कौशल्याभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम केले पाहिजे असे मत डॉ आयेशा रंग्रेझ यांनी व्यक्त केले.

फोटो ओळ

कल्याणशेट्टी महाविद्यालयात व्याख्यान प्रसंगी प्रा डॉ आयेशा रंग्रेझ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button