ग्रामीण घडामोडी

एसबीआय वागदरी शाखेकडून मृतांच्या वारसांना २० लाख रुपयांचा विमा धनादेश सुपूर्द

अपघातातील मृतांच्या वारसांना एसबीआय वागदरी शाखेकडून २० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शाखा अधिकारी केदारनाथ चौगुले, विमा व्यवस्थापक कुमार उसाकोयल, रोहित गायकवाड, निलेश पाटील, सिद्धार्थ बिंदगे उपस्थित.

एसबीआय वागदरी शाखेकडून मृतांच्या वारसांना २० लाख रुपयांचा विमा धनादेश सुपूर्द

अक्कलकोट – एसबीआय जनरल इन्शुरन्स अंतर्गत विमा उतरवलेले तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथील रहिवासी परमेश्वर अर्जुन सुरवसे यांच्या वारसदार पत्नी अनुसया सुरवसे यांना एसबीआय वागदरी शाखेकडून २० लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला.

मंगळवारी वागदरी येथील एसबीआय शाखेत आयोजित साध्या कार्यक्रमात शाखा व्यवस्थापक केदारनाथ चौगुले यांनी अनुसया सुरवसे यांना २० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. परमेश्वर सुरवसे यांचे वगादरी शाखेत खाते होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले होते. त्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स अंतर्गत केवळ १ हजार रुपयांचा विमा उतरवला होता.

या प्रसंगी बोलताना विमा व्यवस्थापक कुमार उसाकोयल म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात काय घडेल हे सांगता येत नाही. कुटुंबप्रमुखाला काही झाले तर कुटुंब संकटात सापडते. अशावेळी विमा हा मोठा आधार ठरतो. केवळ १ हजार रुपयांच्या विमा प्रीमियममुळे आज या कुटुंबाला २० लाख रुपयांची मदत मिळाली आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी असा विमा काढावा,” असा सल्ला त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला अधिकारी रोहित गायकवाड, निलेश पाटील, सिद्धार्थ बिंदगे, अंकुश सावंत, धनप्पा सलगरे तसेच सुरवसे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

फोटो: अपघातातील मृतांच्या वारसांना एसबीआय वागदरी शाखेकडून २० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शाखा अधिकारी केदारनाथ चौगुले, विमा व्यवस्थापक कुमार उसाकोयल, रोहित गायकवाड, निलेश पाटील, सिद्धार्थ बिंदगे उपस्थित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button