गावगाथा

सलगर जिल्हा परिषद गटातून भाजपाचे शिवराज बिराजदार इच्छुक.

जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी

सलगर जिल्हा परिषद गटातून भाजपाचे शिवराज बिराजदार इच्छुक.
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
सलगर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते शिवराज बिराजदार यांनी निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, सदरील गट अनुसूचित ओबीसी (आरक्षित) श्रेणीसाठी राखीव असल्याने, बिराजदार यांना उमेदवारी देण्याची मागणी सलगर जिल्हा परिषद गटातून होत आहे.
भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज बिराजदार यांनी सामुदायिक विवाह सोहळा, कोरोना काळात देखील केलेली भरीव मदत, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप व हुरडा महोत्सव यासह विविध सामाजीक उपक्रम राबवित असतात.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विजयासाठी अहोरात्र काम केले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे विश्वासू व समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भाजपने त्यांना संधी दिल्यास निश्चितच पक्षाला फायदा होऊ शकतो.
त्याचबरोबर युवकांचे संघटन करून शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिक सर्व सामान्य गोर गरिब नागरिकांचे अनेक प्रश्न दवाखाना, पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून यासह सामाजिक कार्यातून आक्रमकपणे प्रशासन दरबारी मांडून न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.
सलगर जिल्हा परिषद गटात भल्याभल्यांना दे धक्का देत शिवराज बिराजदार यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या समाजपयोगी कार्याच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी तयार केली आहे.
सध्या शिवराज बिराजदार यांची सलगर जिल्हा परिषद गटाची चाचपणी सुरू असून मतदार संघाचे बांधणी देखील चालू केले आहे.
सलगर जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाल्याने भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते शिवराज बिराजदार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी सलगर जिल्हा परिषद गटातून होत आहे.
सलगर जिल्हा परिषद गटात सध्या दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढत आहे. आता शिवराज बिराजदार यांनी देखील सलगर जिल्हा परिषद गटात निवडणुकीत उतरल्याने जिल्हा परिषद गटाची निवडणूकीची चुरस आता अधिकच वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
चौकट :
सलगर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असून, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी संधी व लढण्याची बळ दिल्यास सलगर जिल्हा परिषद गटावर सत्ता काबीज करून इतिहास घडविणार असल्याचे शिवराज बिराजदार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button